Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Trekking Vs Travel Insurance: दोघांमधील फरक आणि फायदे समजून घ्या!

Trekking Insurance vs. Travel Insurance

Trekking Insurance Vs. Travel Insurance: ट्रेकिंग इन्शुरन्स आणि ट्रॅव्हल इन्शुरन्स हे दोन्ही प्रकार नियमित इन्शुरन्सचाच एक भाग आहे. ट्रॅव्हल इन्शुरन्सद्वारे पॉलिसीधारकाला प्रवासादरम्यान काही अनपेक्षित घटनांमुळे आर्थिक नुकसान झाल्यास त्याची भरपाई मिळण्याची तरतूद असते. तर ट्रेकिंग इन्शुरन्स हा ट्रॅव्हल इन्शुरन्सचा एक पुढचा टप्पा आहे.

Trekking Insurance Vs. Travel Insurance: ट्रेकिंग इन्शुरन्स आणि ट्रॅव्हल इन्शुरन्स हे दोन्ही प्रकार नियमित इन्शुरन्सचाच एक भाग आहे. इन्शुरन्स म्हणजे काय? हे तर तुम्हाला माहिती असेलच ना! इन्शुरन्स कंपनी आणि इन्शुरन्स विकत घेणारा यांच्यातील करार म्हणजे इन्शुरन्स. या करारात नमूद केल्यानुसार पॉलिसीधारकाला काही नियम व अटींना धरून आर्थिक नुकसान भरपाई मिळते.

अशाच पद्धतीने ट्रॅव्हल इन्शुरन्सद्वारे पॉलिसीधारकाला प्रवासादरम्यान काही अनपेक्षित घटनांमुळे आर्थिक नुकसान झाल्यास त्याची भरपाई मिळण्याची तरतूद असते. यामध्ये वैयक्तिक सुरक्षिततेसह, ट्रिप रद्द होणे, मेडिकल इमर्जन्सी, टूर लांबणे किंवा प्रवासात सामान चोरीला गेल्यास किंवा हरवल्यास त्याची नुकसान भरपाई मिळण्याची तरतूद असते. थोडक्यात सांगायचे झाले तर ट्रॅव्हल इन्शुरन्स प्रवासादरम्यान कोणत्याही अनपेक्षित घटनांपासून आर्थिक संरक्षण पुरवतो.

ट्रेकिंग इन्शुरन्स हा ट्रॅव्हल इन्शुरन्सचा एक पुढचा टप्पा आहे. हा इन्शुरन्स साहसी आणि धाडसी लोकांसाठी आहे. ट्रेकिंग या शब्दामध्येच थ्रील आहे. इथे वैयक्तिक सुरक्षिततेसाठी सेफ्टी गिअर्सचा वापर तर केला जातोच. पण त्याचबरोबर ट्रेकिंग इन्शुरन्स सुद्धा काढला जातो. यामुळे अनपेक्षित संकटांमुळे येणाऱ्या आर्थिक खर्चातून सुरक्षितता मिळते.

ट्रॅव्हल इन्शुरन्स म्हणजे काय?

ट्रॅव्हल इन्शुरन्समध्ये प्रवासादरम्यान अनपेक्षित अपघातामुळे झालेल्या आर्थिक नुकसानाची भरपाई मिळण्यास मदत होते. त्याचबरोबर ट्रॅव्हल इन्शुरन्समधून सामानाची चोरी झाल्यास किंवा ते हरवल्यास त्याची नुकसान भरपाई मिळण्याची तरतूद ट्रॅव्हल इन्शुरन्समध्ये आहे.

ट्रॅव्हल इन्शुरन्समध्ये काय कव्हर होते?

Benefits of Travel Insurance

ट्रॅव्हल इन्शुरन्समध्ये एखाद्याचा पासपोर्स हरवल्यास किंवा विमान/बस हायजॅक झाल्यास किंवा प्रवासादरम्यान एखादे सामान/वस्तू हरवल्यास त्याची नुकसान भरपाई मिळण्याची तरतूद असते. त्याचबरोबर प्रवासात असताना सामानाची चोरी झाल्यास, किंवा संपूर्ण ट्रिप कॅन्सल झाल्यास, हॉटेल/विमानाचे बुकिंग रद्द झाल्यास त्याचीही नुकसान भरपाई मिळण्याची तरतूद असते.

ट्रॅव्हल आणि ट्रेकिंग इन्शुरन्समध्ये थोड्याफार फरकाने समानच उद्दिष्टे आहेत. पण तुम्ही यापैकी इन्शुरन्स घेताना कोणताही इन्शुरन्स घेऊ नका. तुमची नेमकी गरज काय आहे. संभाव्य धोके काय असू शकतात. याचा आढावा घेऊनच योग्य तो इन्शुरन्स काढा. 

ट्रेकिंग इन्शुरन्स म्हणजे काय?

ट्रेकिंग करताना शारीरिक आणि मानसिकरीत्या तयार असणे गरजेचे तर आहेच. पण त्याचबरोबर ट्रेकिंगमधील संभाव्य धोके लक्षात घेऊन त्यानुसार इन्शुरन्स काढणे आवश्यक आहे. यामध्ये मेडिकल इमर्जन्सीचा खर्च, अपघातामुळे झालेला खर्च, तसेच सामानाची चोरी होणे किंवा वस्तू हरवणे, ट्रिप रद्द झाल्यामुळे होणाऱ्या नुकसानीपासून ट्रेकिंग इन्शुरन्समध्ये आर्थिक सुरक्षितता मिळते.

What is Trekking Insurance

ट्रेकिंग इन्शुरन्समध्ये काय कव्हर होते?

ट्रेकिंग इन्शुरन्समध्ये ट्रिप कॅन्सल झाली किंवा ट्रेक दरम्यान मेडिकल इमर्जन्सी आली, अपघातामुळे तुमच्या दातांना इजा झाली किंवा प्रवासादरम्यान एखादी तुमची एखादी वस्तू हरवली, चोरीला गेली तर त्याची आर्थिक नुकसान भरपाई मिळण्याची तरतूद ट्रेकिंग इन्शुरन्समध्ये असते.

ट्रेकिंगदरम्यान मेडिकल इमर्जन्सी म्हणून विमानाने किंवा हॅलिकॉप्टरने आणावे लागते. त्यावेळी होणारा खर्च खूप असतो. असा खर्च देखील या इन्शुरन्समध्ये समावेश होतो.