Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Pay After Delivery : रेल्वे प्रवासात जेवणाची डिलिव्हरी घ्या, नंतर पैसे द्या; झूपची सिंपल सोबत भागीदारी

Pay After Delivery : रेल्वे प्रवासात जेवणाची डिलिव्हरी घ्या, नंतर पैसे द्या; झूपची सिंपल सोबत भागीदारी

Image Source : www.wallpapercave.com/www.sugermint.com

रेल्वेने झूप आणि सिंपलची भागीदारी केल्यामुळे प्रवाशांना आता रेल्वेमध्ये प्रवासादरम्यान जेवण ऑर्डर करता येणार आहे. यासाठी प्रवाशांना ऑर्डर बुक करताना पेमेंट करण्याची अथवा कॅशऑन डिलिव्हरी हे पर्याय निवडण्याची गरज नाही; ज्यावेळी तुमचे जेवण तुम्हाला प्राप्त होईल त्यावेळी तुम्ही ते पेमेंट ऑनलाईन पे करू शकता. Zoop ची ही सुविधा प्रवाशांना 150 हून जास्त स्टेशनवर उपलब्ध होणार आहे.

भारतीय रेल्वेकडून प्रवाशांच्या सोयी सुविधांवर जास्त भर दिला जात आहे. आरामदायी रेल्वे प्रवासासोबत रेल्वे प्रवाशांना Zoop App च्या माध्यमातून त्यांच्या सीटवर ऑनलाईन जेवण ऑर्डर करता येत होते. आता आयआरसीटीसी (Indian Railway Catering and Tourism Corporation- irctc) कडून त्यामध्ये पे अॅफ्टर डिलिव्हरी बी आणखी एक सुविधा जोडण्यात आली आहे. यासाठी आयआरसीटीसीने सिंपल (Simpl App) सोबत भागीदारी केली आहे.

काय आहे ZOOP आणि Simpl

Zoop हे IRCTC ने मंजूर केलेले अधिकृत भारतीय रेल्वे अॅप आहे. या माध्यमातून तुम्हाला रेल्वे प्रवासादरम्यान ऑनलाइन जेवण ऑर्डर करता येते. तर Simpl हे तुम्हाला ऑनलाईन खरेदीचा पर्याय उपलब्ध करून देणारे एक मोबाईल अॅप्लिकेशन आहे. सिंपलचे वैशिष्ठ हे आहे की, तुम्ही एखादी वस्तू ऑनलाईन खरेदी केल्यानंतर तुम्हाला त्याचे पैसे लगेच द्यावे लागणार नाहीत. त्याच प्रमाणे आता रेल्वेच्या झूप आणि सिंपलची भागीदारी करण्यात आल्याने आता प्रवाशांचा देखील फायदा होणार आहे.

जेवण मिळाल्यावर पे करा-

रेल्वेने झूप आणि सिंपलची भागीदारी केल्यामुळे प्रवाशांना आता रेल्वेमध्ये प्रवासादरम्यान जेवण ऑर्डर करता येणार आहे. यासाठी प्रवाशांना ऑर्डर बुक करताना पेमेंट करण्याची अथवा कॅशऑन डिलिव्हरी हे पर्याय निवडण्याची गरज नाही; ज्यावेळी तुमचे जेवण तुम्हाला प्राप्त होईल त्यावेळी तुम्ही ते पेमेंट ऑनलाईन पे करू शकता. Zoop ची ही सुविधा प्रवाशांना 150 हून जास्त स्टेशनवर उपलब्ध होणार आहे. तसेच प्रवाशांना नियोजित यात्रेपूर्वी देखील जेवण बूक करता येणार आहे. त्याचे पेमेंट तुम्ही प्रवाशाच्या दिवशी जेवण प्राप्त झाल्यानंतर करू शकणार आहात.

अशी करा जेवणाची ऑर्डर

  • Zoopindia.com वर जाऊन  तुम्ही Zoop Android App डाऊनलोड करा
  • तुमच्या तिकिटाचा PNR क्रमांक टाका 
  • त्यानंतर तुम्हाला जेवण कोणत्या स्टेशनवर पाहिजे त्याची निवड करा
  • तुम्हाला योग्य वाटेल ते रेस्टारंट आणि जेवणाची निवड करा
  • त्यानंतर चेकआऊट पेजवर Pay After Delivery पर्याय निवडा
  • त्यानंतर तुम्हाला निश्चित स्टेशनवर जेवण प्राप्त होईल
  • त्यानंतर तुमच्या सिंपल खात्यामध्ये जेवणाचे बिल प्राप्त होईल.
  • त्यानंतर तुम्ही तुमच्या जेवणाचे बिल पे करू शकता