Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Toyota Car Sale: व्होक्सवॅगन, होंडाला मागे टाकत टोयोटाची नंबर वन कामगिरी! कार विक्रीमध्ये जगात आघाडीवर

Toyota Car Sale

जपानी कार निर्मिती कंपनी टोयोटाने यशाला गवसणी घातली आहे. जगभरात सर्वाधिक कार विक्री होणारी कंपनी टोयोटा ठरली आहे. व्होक्सवॅगन, होंडाला मागे टाकत कंपनीने पहिला क्रमांक पटकावला आहे.

Toyota Car sale: जपानी कार निर्मिती कंपनी टोयोटाने यशाला गवसणी घातली आहे. जगभरात सर्वात जास्त विक्री होणारी कार कंपनी टोयोटा ठरली आहे. व्होक्सवॅगन, होंडाला मागे टाकत कंपनीने कार विक्रीत पहिला क्रमांक पटकावला आहे. 2022 वर्षात टोयोटा कंपनीच्या सर्वाधिक कार विक्री झाल्या. मागील वर्षी व्होक्सवॅगन कंपनीची विक्री 7% कमी झाली. कच्च्या मालाचा पुरवठा आणि वाहतूक साखळीत अडथळा निर्माण झाला असतानाही टोयोटा कंपनीने बाजी मारली आहे.

टोयोटा कंपनीच्या उपकंपन्या Daihatsu Motor Co आणि Hino Motors Ltd यांनी चांगली कामगिरी केली नसतानाही टोयोटाच्या सर्वाधिक गाड्या विकल्या गेल्या. या दोन्ही कंपन्यांच्या मिळून 10.5 मिलियन गाड्या जगभरात मागील वर्षी विकल्या गेल्या. व्होक्सवॅगन कंपनीसाठी मागचे वर्ष अत्यंत खराब गेले. कंपनीने 2022 वर्षात 8.3 मिलियन गाड्यांची विक्री केली. ही आकडेवारी मागील 11 वर्षात सर्वात जास्त निराशाजनक ठरली आहे. जर्मन कंपनी व्होक्सवॅगन ही टोयोटाची मुख्य प्रतिस्पर्धक आहे. जागतिक स्तरावर मंदीच्या सावटामुळे गाड्यांची मागणीही कमी झाली आहे. 

अमेरिकेतील जनरल मोटर्स आणि होंडा, ह्युंदाई या कंपन्यांनाही टोयोटाने कार विक्रीत मागे टाकले आहे. सर्वाधिक गाड्यांची विक्री होऊनही पुरेशा कारची निर्मिती करण्यात अडथळे येत असल्याचे मत टोयोटाने व्यक्त केले आहे. कच्चा माल आणि सेमिकंडक्टरचा पुरवठा कोरोनानंतर विस्कळित झाला असून अद्याप पूर्णत: व्यवस्थित झाला नाही.

मागली वर्षी एप्रिलपासून टोयोटाने 1 कोटी 60 लाख कार निर्मितीचे टार्गेट ठेवले आहे. मात्र, यामध्ये 10% बफर ठेवला आहे. बाह्य अडथळ्यांमुळे 10 टक्के गाड्यांची निर्मिती कमी होऊ शकते, असे कंपनीचे म्हटले होते. सेमिकंडक्टच्या तुटवड्यामुळे कार निर्मितीमध्ये अडथळे येत आहेत. पुढील आर्थिक वर्षात व्होक्सवॅगन कंपनीची निर्मिती आणि विक्री वाढण्याची शक्यता S & P ग्लोबल मोबिलिटी संस्थेने वर्तवली आहे.