मे महिन्यात टोयोटा किर्लोस्कर मोटर (TKM) ची विक्री दुप्पट झाली. TKM कंपनीने मे महिन्यात एकूण 20,410 टोयोटा युनिट्सची विक्री केली आहे. तर 2022 च्या मे महिन्यात केवळ 10,216 युनिट्सची विक्री झाली होती. गेल्या महिन्यात (मे 2023) देशांतर्गत बाजारात टोयोटाची घाऊक विक्री 19,379 युनिट्स झाली आहे. तसेच मे महिन्यात अर्बन क्रूझर हायरायडरच्या 1,031 युनिट्सची निर्यात केली. टोयोटा किर्लोस्कर मोटरचे उपाध्यक्ष (विक्री आणि स्ट्रॅटेजिक मार्केटिंग) अतुल सूद म्हणाले की, "कंपनीने मे महिन्यात आतापर्यंतची सर्वाधिक मासिक विक्री नोंदवली आहे. ग्राहकांच्या गरजांना प्राधान्य देऊन आम्ही येणाऱ्या पूढील वर्षासाठीही आशावादी आहोत."
टोयोटो यावर्षी दोन मॉडेल लाँच करणार
जपानी ऑटोमेकर कंपनी टोयोटा या वर्षी देशात मारुती सुझुकीच्या वाहनांशी स्पर्धा करेल असे दोन मॉडेल लॉन्च करू शकते. यापैकी एक Fronx वर आधारित SUV असेल आणि दुसरी Ertiga वर आधारित MPV असेल. मारुती सुझुकी फ्रॉन्क्सवर आधारित टोयोटाच्या नवीन एसयूव्ही कूपमध्ये स्टाइलिंगच्या बाबतीत अनेक बदल होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे ती फ्रॉन्क्सपेक्षा वेगळी दिसेल. यारिस क्रॉसचे डिझाइन घटक या कूप एसयूव्हीमध्ये आढळू शकतात. त्याची पुढची रचना अर्बन क्रूझर हायराइडरसारखी असू शकते, तर मागील बाजूस यारिस क्रॉसची झलक दिसू शकते.
एर्टिगा MPV वर आधारित टोयोटाच्या नवीन 3-रो MPV मध्ये देखील डिझाइन बदल दिसून येतील. कंपनीने आधीच दक्षिण आफ्रिकेच्या बाजारात Rumion नावाने री-बैज Ertiga विक्रीस ठेवल्या आहे. तर, भारतात विकल्या जाणाऱ्या विशिष्ट मॉडेलमध्ये मोठे डिझाइन बदल आणि अद्ययावत केबिन मिळेल. यात नवीन डिझाइन केलेले फ्रंट आणि रिवाइज्ड रियर मिळू शकते. इनोव्हा हायक्रॉसचे स्टाइलिंग एलिमेंट्सही त्यात दिसू शकतात.
भारतातील टोयोटाची स्थिती
भारतात टोयोटाचे अनेक प्रॉडक्ट आहे. टोयोटाकडे सध्या भारतात 8 कार आहेत, ज्यात हॅचबॅक ते MPV आणि फुल साइज SUV पर्यंत गाड्यांचा समावेश आहे. टोयोटाने अलीकडेच इनोव्हा हायक्रॉस सादर केली आणि त्याआधी अर्बन क्रूझर हायरायडर लाँच केली. टोयोटाच्या भारतातील पोर्टफोलिओमध्ये 1 कोटी रुपयांच्या कार आहेत. टोयोटा वेलफायर हे कंपनीचे भारतातील सर्वात महागडे उत्पादन आहे. Toyota Vellfire ची किंमत 94.45 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे, जी ऑन-रोड आल्यावर 1 कोटींहून अधिक जाते.