शेअर मार्केटमधील चढ उतारांमध्ये बहुतांश शेअर्सची होरपळ झाली. निफ्टी स्मॉलकॅप निर्देशांकात 15% घसरण झाली असली तरी जवळपास 26 शेअर्सनी गुंतवणूकदारांना मालामाल केल्याचे समोर आले आहे. यातील काही शेअर्स हे 200% पेक्षा अधिक वाढले. सर्वच्या सर्वच 26 स्मॉलकॅप शेअर्सची किंमत वर्षभरात दुप्पट झाली. शेअर्स 100% हून अधिक वाढले.
मल्टीबॅगर स्मॉलकॅप शेअर्समध्ये क्रेसंडा सोल्युशनचा शेअर सर्वाधिक 274% वधारला. त्याखालोखाल चॉईस इंटरनॅशनलचा शेअर 272% ने वाढला. बीएलएस इंटरनॅशनलचा शेअर 231%, ज्योती रेजिंगचा शेअर 200% आणि दि उगर शुगर वर्क्सचा शेअर 194% नी वधारला. या शेअर्सनी 2022 मध्ये गुंतवणूकदारांची मालमत्ता तिपटीने वाढवली.
बीएलएस इंटरनॅशनलने वर्ष 2022 मध्ये महसुलात वाढ झाली. त्याशिवाय नोमुरा कंपनीने बीएलएस इंटरनॅशनलमध्ये हिस्सा खरेदी केली. बीएलएस इंटरनॅशनलने याच वर्षात 1:1 बोनस शेअर इश्यू केला होता. जहाज बांधणी व्यवसायातील सरकारी कंपनी माझगाव डॉक शिपबिल्डर्सचा शेअर वर्ष 2022 मध्ये मल्टीबॅगर ठरला. हा शेअर वर्षभरात 151% ने वधारला.युको बँकेच्या शेअरमध्ये देखील दुपटीने वाढ झाल्याचे दिसून आले.
स्मॉलकॅप मल्टीबॅगर शेअर्सच्या गटात वाडीलाल इंडस्ट्रीज, टीसीपीएल पॅकेजिंग, केपीआय ग्रीन एनर्जी, टीजीव्ही एसआरएसीसी, स्पेशालिटी रेस्टरॉंट, मोनार्च नेटवर्थ कॅपिटल, ग्रेट ईस्टर्न शिपींग कंपनी, रेमंड,रामा स्टील ट्युब्स, अपार इंडस्ट्रीज, भारत डायनॅमिक्स, दि कर्नाटका बँक, जगसोनपाल फार्मा, मॅरेथॉन नेक्स्टजेन रियल्टी, लॉइड्स मेटल्स, आरएचआय मॅग्नेसिटा इंडिया, शांती गिअर्स, शॉपर्स स्टॉप, रोसेल इंडिया हे शेअर्स मल्टीबॅगर ठरले आहेत.