पेट्रोल डिझेलचे दर वाढत असताना CNG कारला ग्राहकांकडून पसंती मिळत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, CNG कार पेट्रोल डिझेल कारपेक्षा जास्त परवडते. अफोर्डेबल कारला भारतीयांची कायमच पसंती राहिली आहे. इलेक्ट्रिक कारचा पर्यायही काही ग्राहक पडताळून पाहत आहेत. मात्र, किंमत आणि चार्जिंगची सुविधा यामुळे अनेकजण अद्यापही EV कार घेण्यासाठी तयार नाहीत. यातून मध्यम मार्ग काढत CNG कार चांगला (CNG cars under 10 lakhs) पर्याय आहे. दहा लाखांच्या आतील परवडणाऱ्या दरातील काही बेस्ट CNG कार्स पाहू.
मारुती सुझुकी स्वीफ्ट (Maruti Suzuki Swift CNG)
www.carmudi.com.
हॅचबॅक कार्समध्ये मारुती सुझुकी CNG स्वीफ्टने बाजारपेठ काबीज केली आहे. स्वीफ्टचे CNG इंजिन 1.2 लिटर क्षमतेचे आहे. फोर सिलिंडर, ड्युअल जेट इंजिन, 89 Ps पॉवर आणि 113 nm टॉर्क जनरेट करते. 39.90 किमी. प्रति किलोचा दावा कंपनीकडून करण्यात येतो. ही कार मॅन्युअल गिअर बॉक्समध्ये असून VXi आणि ZXi हे दोन व्हेरियंट उपलब्ध आहेत. या गाडीची एक्स शोरुम किंमत 7.8 लाख रुपये आहे.
टाटा टियागो (Tata Tiago iCNG)
www.tatamotors.com
टाटाची Tiago iCNG ही कार CNG सेगमेंटमध्ये सर्वाधिक परवडणारी आहे. या गाडीला 1.2 लिटर क्षमतेचे इंजिन देण्यात आले आहे. थ्री सिलेंडर रिव्होट्रॉन इंजिन असून यातून 86 ps पॉवर तर 95Nm टॉर्क जनरेट होतो. 26.49 km/kg अॅवरेजचा दावा कंपनीकडून करण्यात येतो. टियागोला फाइव्ह स्पीड म्युन्युअल गिअर बॉक्स आहे. तर चार व्हेरियंटमध्ये कार उपलब्ध आहे. 6.30 (एक्स शोरुम) लाखांपासून गाडीची किंमत सुरू होते.
ह्युंदाई ग्रँड i10 (Hyundai Grand i10 Nios)
www.cardekho.com
Grand i10 Nios गाडीमध्ये अनेक फिचर्स देण्यात आली आहेत. या गाडीला 1.2-litre क्षमतेचे इंजिन देण्यात आले आहे. चार सिलिंडर इंजिनमधून 83 ps आणि 113 nm टॉर्क जनरेट होतो. 5-speed गिअर बॉक्स असून तीन व्हेरियंटमध्ये गाडी उपलब्ध आहे. Magna, Sportz and Asta ही तीन CNG व्हेरियंट उपलब्ध आहेत. Sportz गाडीची एक्स शोरुम किंमत 7.70 लाख रुपये आहे. तर Astra व्हेरियंटची किंमत 8.45 लाख (CNG cars under 10 lakhs) (एक्स शोरुम) रुपये आहे.
ह्युंदाई Aura (Hyundai Aura CNG)
www.91wheels.com
ह्युंदाई Aura ही कॉम्पॅक्ट सेदान कार असून ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. Grand i10 Nios मध्ये जे इंजिन आहे, तेच या कारमध्ये वापरण्यात आले आहे. चार सिलिंडर इंजिनमधून 83 ps आणि 113 nm टॉर्क जनरेट होतो. CNG इंधनावर कार चालवताना 68 bhp आणि टॉर्क 95 Nm पर्यंत खाली येतो. (CNG cars under 10 lakhs) ही गाडी दोन व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. Aura गाडीची एक्स शोरुम किंमत 6.09 लाख रुपये तर Aura SX ची एक्स शोरुम किंमत 8.57 लाख रुपये आहे.
मारुती सुझुकी बलेनो (Maruti Suzuki Baleno)
www.smartprix.com
मारुती सुझुकीची बलेनो ही गाडीही CNG व्हेरियंटमध्ये उत्तम पर्याय आहे. या गाडीला 1197 cc चे इंजिन देण्यात आले आहे. प्रती लिटर 22 किमी चे अॅवरेज कार देते. सहा रंगांमध्ये ही कार उपलब्ध आहे. या गाडीची एक्स शोरुम किंमत 6.56 - 9.83 च्या दरम्यान आहे. Maruti Baleno Zeta CNG हे नवे मॉडेल कंपनीने आणले आहे. मात्र, याची किंमत दहा लाखांच्या थोडी पुढे जाते. ही गाडी फक्त CNG वर असून 30.61 किलोमीटर per kg अॅवरेज देते.