Pop Icon Singer Beyoncé: जगातील सर्वात महागडया हॉटेलबाबत जाणून घेवुयात. हे हॉटेल एक रात्र थांबण्यासाठी 81 लाख रूपये भाडे आकरतात. विशेष म्हणजे या हॉटेलमध्ये पॉप आयकॉन सिंगर बियॉन्से (Pop Icon Singer Beyoncé) काही दिवसांपूर्वी थांबली होती. या महागडया हॉटेल विषयी जाणून घेवुया.
जगातील सर्वात महागडे हॉटेल (The most Expensive Hotel in the World)
जगातील सर्वात महागडे हॉटेल हे दुबई (Dubai) येथे आहे. हे हॉटेल अल्ट्रा-लक्जरी रिज़ॉर्ट असून त्याचे नाव ‘अटलांटिस रॉयल’(Atlantis Royal) असे आहे. या हॉटेलमध्ये काही दिवसांपूर्वी पॉप सिंगर बियान्से थांबली होती . येथे एक रात्र थांबण्यासाठी 81 लाख रूपये भाडे घेतले जाते.
पॉप आयकॉन सिंगर बियॉन्से का थांबली (Why Pop icon Singer Beyoncé Stay)
21 जानेवारी रोजी अटलांटिस रॉयलच्या उद्घाटनप्रसंगी येथे थांबली होती. याठिकाणी अमेरिकन गायक-गीतकार आणि इतर काही जागतिक सेलिब्रिटींसह एक मैफिल सादर केली. या हॉटेलच्या खोल्यांचे बुकिंग साधारण फेब्रुवारीमध्ये सुरू करण्यात येणार आहे. सन न्यूजपेपरनुसार, बेयॉन्सेने हॉटेलच्या लॉन्च इव्हेंटमध्ये परफॉर्म करण्यासाठी $24 मिलियन डॉलर घेतले. यूके गायक रॉबी विल्यम्स आणि डीजे स्वीडिश हाऊस यांनीदेखील सादरीकरण केले.
कसे आहे हे हॉटेल (How is The Hotel)
या रॉयल हॉटेलमध्ये चार बेडरूम असून येथे एक सुंदर असा ओपन एरियादेखील आहे. तसेच याला जोडणारा एक इन्फिनिटी पूलसुद्धा आहे. याव्यतिरिक्त, दोन-स्तरीय पेंटहाऊसमध्ये 100 वर्षे जुनी ऑलिव्ह झाडे आणि एक टेरेस असलेले खाजगी घर आहे. या हॉटेलमध्ये बसून अरबी समुद्र आणि पाम बेटाची विलक्षण दृश्ये पाहायला मिळतात. हॉटेल 43 मजली उंच आहे आणि त्यात 90 स्विमिंग पूल, 22व्या मजल्यावर एक इन्फिनिटी पोल आहेत.