भारतीय ग्राहकांमध्ये कार घेण्याचे प्रमाण मागील काही वर्षात वाढले असले तरीही दुचाकीवरचे प्रेमही कमी झालेले नाही. दैनंदिन वापरासाठीच्या टु व्हीलर आणि प्रिमियम स्पोर्ट्स टु व्हीलर गाड्यांची विक्रीही भारतात वाढली आहे. या सेगमेंटमध्ये वाहन निर्मिती कंपन्या अनेक नवनवीन मॉडेल्स घेऊन येत आहे. इलेक्ट्रिक टू व्हिलरचे प्रमाणही वाढत आहे. मागील वर्षी डिसेंबरमहिन्यात हिरो मोटार कॉर्प या कंपनीच्या सर्वाधिक गाड्या विकल्या गेल्या. पाहूया कोणत्या कंपनीने किती गाड्यांची विक्री केली.
हिरो मोटोकॉर्प (Hero Motocorp sale in India)
www.deccanchronicle.com
मागील वर्षी डिसेंबर महिन्यात हिरो मोटोकॉर्पने 3 लाख 81 हजार 365 गाड्यांची विक्री करत प्रथम क्रमांक पटकावला. डिसेंबर 2021 मध्ये विक्री केलेल्या गाड्यांपेक्षा 1.8% जास्त गाड्या विकल्या. 2021 याच दरम्यान कंपनीने 3,74,485 गाड्यांची विक्री केली होती. हिरो ही जगातील आघाडीची टुव्हीलर निर्मिती कंपनी आहे. स्पेंलंडर ही कंपनीची सर्वाधिक खप होणारी गाडी आहे. त्यासोबतच कंपनीची हिरो प्लेजर ही स्कूटी देखील सर्वाधिक विक्री होते.
होंडा (Honda two Wheller sale in India)
auto.economictimes.indiatimes.com
होंडा कंपनीने डिसेंबर महिन्यात 2 लाख 33 हजार 151 दुचाकी विकल्या. 2021 मध्ये याच काळात कंपनीने 2,10,638 दुचाकी विकल्या होत्या. तब्बल 10.7 टक्के विक्रीतील वाढ कंपनीने नोंदवली आहे. होंडा अॅक्टिव्हा ही कंपनीची सर्वात जास्त विकली जाणारी स्कूटी आहे. होंडाने नुकतेच अॅक्टिव्हा H smart ही स्कूटी लाँच केली आहे. मोटारसायकल सेगमेंटमध्ये होंडा सीबी शाइन गाडीची सर्वाधिक विक्री झाली.
टीव्हीएस (TVS sale in India)
डिसेंबर महिन्यात 1,61,369 गाड्यांची विक्री करत टीव्हीएस तिसऱ्या क्रमांकावर आहे. मागील वर्षी याच काळात कंपनीने 1,46,763 गाड्यांची विक्री केली होती. कंपनीने 10% वाढ नोंदवली आहे. टीव्हीएस ज्युपीटर ही सर्वाधिक विक्री होणारी स्कुटी आहे. तर टीव्हीएस रायडर ही सर्वाधिक विक्री होणारी दुचाकी आहे. मागील वर्षीपेक्षा या गाडीच्या विक्रीत 140% वाढ झाली आहे.
बजाज (Bajaj two Wheller sale in India)
www.bajajauto.com
बजाज कंपनीने डिसेंबर महिन्यात 1,25,525 गाड्यांची विक्री केली. 2021 डिसेंबर महिन्याशी तुलना करता कंपनीने 1.6 वाढ नोंदवली. बजाज पल्सर 125 ही सर्वाधिक विक्री झालेली बाईक ठरली. त्यानंतर प्लॅटिना आणि पल्सर 150 गाडीची जास्त विक्री झाली. चेतक स्कूटीची विक्री मागील वर्षाच्या तुलनेत 300 टक्क्यांपेक्षा जास्त वाढली आहे.
रॉयल एनफिल्ड (Royal Enfield)
रॉयल एनफिल्ड दुचाकी विक्रीमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. डिसेंबर 2022 मध्ये कंपनीने 59,821 गाड्या विकल्या. मागील वर्षी याच काळात कंपनीने 65,194 गाड्या विकल्या होत्या. कंपनीची विक्री 2021 च्या तुलनेत घटली आहे. Classic 350 ही सर्वाधिक विक्री होणारी दुचाकी आहे. त्यापाठोपाठ Hunter 350 गाडीची विक्री होते.