Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Best Seller Stress Buster Gadgets: 2022 वर्षातील टॉप 5 विकले गेलेले स्ट्रेस बस्टर गॅजेट्स कोणते?

Top 5 Best Selling Stress Buster Gadgets

Best Seller Stress Buster Gadgets: सध्या रिलॅक्स होण्यासाठी, स्ट्रेस बर्स्ट करण्यासाठी विविध माध्यमांचा वापर केला जातो. यात आता इलेक्ट्रीक गॅजेट्सही वापरले जात आहेत. तर, कोणते 5 गॅजेट्स सर्वाधिक खरेदी झाले ते आपण या लेखातून जाणून घेऊयात.

Best Seller Stress Buster Gadgets: मुंबईला कधीही न झोपणारे शहर म्हणतात, मात्र आता संपूर्ण देशाची स्थिती तशीच होत आहे. वाढते शहरीकरण, बदलणारी जीवनशैली, काम, अभ्यास, सतत अचीव्ह करण्याचे प्रेशर यामुळे आपल्या शरिरासह आपला मेंदूही थकतो. आता त्याला विश्रांती देण्याची, त्याल पँपर करण्याची गरज भासू लागली आहे. या धकधकीच्या जीवनामुळे आपल्या झोपेवरही परिणाम झाला आहे, यामुळे आपले मानसिक स्वास्थही कमकुवत होऊ लागले आहे. तर स्वत:ला रिलॅक्स करण्यासाठी, आपला ताण हलका करण्यासाठी स्ट्रेस बस्टर गॅजेट्स गेल्या काही काळापासून उपलब्ध झाले आहेत. आपल्या गरजेनुसार या गॅजेट्सची मागणी वाढत आहे, खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे. तर, 2022 मध्ये सर्वाधिक विकले गेलेले टॉप 5 गॅजेट्स कोणते होते ते आपण पाहुयात.

टॉप 5 बेस्ट सेलर स्ट्रेस बस्टर गॅजेट्स (Top 5 Best Seller Stress Buster Gadgets)

  • सेंट डिफ्युजर: खरेतर हे एक पारंपरिक टूल आहे. ज्याचा वापर वर्षानुवर्षे भारतात होतो, आत याला डिफ्युजर म्हणतात. याचा उल्लेख आर्युवेदातही आहे आणि आयुर्वेदीत वैद्य याचा वापर उपचारासाठी आजही करतात. तर यात औषधी तेलांचा वापर केला जातो. दिव्यावर तेलाचे भांडे ठेवले जाते आणि हळूहळू याचा सुगंध रूममध्ये पसरतो. आता, हाच प्रकार इलेक्ट्रीक फॉर्ममध्ये मिळतो. याला एअर प्युरिफायरही अटॅच असते. याच्या सुगंधाने आपल्या मेंदूला रिलॅक्सेशन मिळते. झोप सुधारते, मुड चांगाला होतो. याची किंमत साधारण 800 रुपयांपासून 3 हजार रुपयांपर्यंत आहे. ऑनलाईन बाजारात महाग असून, ऑफलाईन बाजारात याची किंमत 450 पासून सुरू होते.
  • स्लीप अँड वेकअप लाई़ट: सगळ्यांनाच रात्री वेळेत झोपून, सकाळी लवकर उठावे असे वाटते, मात्र तसे कधी घडत नाही. त्यामुळे आपल्या बेडजवळ ठेवण्यासाठी एक इलेक्ट्रीक लॅम्प बाजारात आला आहे. ज्याच्या प्रकाशाचा शरिरावर परिणाम होऊन लवकर झोप लागते असे सांगितले जाते. तर आपण सेट केलेल्या वेळेनुसार सकाळी तो लॅम्प पहाटेच्या सूर्यकिरणांप्रमाणे प्रकाश देतो, ज्यामुळे सहज जाग येते, असे सांगितले. या प्रोडक्टमुळे स्किनला त्रास होत नाही, असेही इन्फ्ल्युएन्सर सांगतात. तर या प्रोडक्टची किंमत हजार रुपयांपासून सुरू होते.
  • साऊंडस्लीप ऊशी: सिनेमा किंवा मालिका पाहताना रात्र झाल्यावर एक विशिष्ट आवाज बॅकराऊंडमध्ये ऐकू येतो. हा आवाज हल्ली कुठे येतही नाही. त्यामुळे आता ऊशीतच तो आवाज बसवला जातो. ऊशीमध्ये मायक्रो फायबर स्पीकर बसवलेला असतो. त्यात रात्री चांगली झोप लागण्यासाठी काही विशिष्ट आवाज रेकॉर्ड केलेले असतात. या ऊशीबाबत माधुरी दिक्षितने एकदा उल्लेख केला होता. त्यामुळे या ऊशीची काही अंशी डिमांड वाढली. ही ऊशी साधारण 450 रुपयांपासून हजार रुपयांपर्यंत मिळते.
  • मेडिटेशन साऊंड सिस्टीम: मेडिटेशन करण्यासाठी शांत बसावे लागते, एकाग्र व्हावे लागते. सध्या कुठेच आवाज नाही, गोंधळ नाही असे ठिकाण सापडणे अशक्य आहे. मात्र त्यातही शांतता मिळालीच तरी अंतर्गत गोंधळ सुरूच असतो. यासाठीच एक ब्ल्यूटुथ स्पीकरप्रमाणे दिसणारी छोटीशी साऊंड सिस्टीम बाजारात मिळते. ज्यात विविध आवाज रेकॉर्डेड असतात, यातील आवाज निवडून शांत बसता येते. एकाग्र राहण्याचा प्रयत्न करता येतो. हे आवाज साऊंड आणि म्युजिक थेरपीस्टद्वारे निवडून यात भरलेले आहेत. ही सिस्टीम दीड हजार ते 2 हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहे.
  • साऊंड व्हायब्रेशन सिस्टीम: आपण योग आणि मेडिटेशन करताना ओमकार म्हणतो, भ्रामरी करतो यामुळे आपली पिट्युटरी ग्लँड व्हायब्रेट होऊन तिला चालना मिळते, ज्यामुळे मेंदूला एकप्रकारे व्यायाम मिळतो, व्हायब्रेशन मिळते, एकूणच शरीर यामुळे रिलॅक्स होते. हाच प्रकार मशिनद्वारे केला जातो. इको डॉटप्रमाणे हे मशिन दिसते. यात रिलॅक्सेशन साऊंड असतात आणि यात मायक्रो व्हायब्रेटर असते. जे आपण शरिराजवळ ठेवून, काही वेळ शांत बसायचे असते. या सिस्टीमची किंमत 500 रुपये ते 2 हजार रुपयांपर्यंत आहे.

मेडिटेशन, स्ट्रेस बस्टर किंवा रिलॅक्सेशनसाठी अनेक प्रोडक्ट्स वापरले जातात. आजही सर्वाधिक पारंपरिक प्रोडक्ट्स वापरण्यावर ग्राहकांचा भर आहे. मात्र सध्या अनेक इलेक्ट्रीक उपकरणे बाजारात आलेली आहेत. त्यापैकी ही 5 उपकरणे अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि काही अंशी दुकानांमध्ये विकली गेलेली टॉप 5 प्रोडक्ट्स आहेत. याची माहिती स्टॅटेस्टीकाने आपल्या अहवालात दिलेली आहे.