Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Best Air Cooler : भारतात सर्वाधिक विकले जाणारे 5 बेस्ट एअरकूलर्स

Top 5 Best Selling Air coolers in India

Image Source : www.mccoymart.com

Top 5 Best Selling Air coolers in India : एप्रिल महिना जवळ जवळ संपत आलाय, लवकरच मे महिन्याची चाहूल लागेल आणि मग सगळीकडेच उकाडा जाणवायला लागला की, सगळ्यांनाच शरीराला फिल होईल असा गार गार वारा पाहिजे असतो. मग कमी पैश्यांमध्ये AC सारखा फिल देईल असा कूलर तुम्ही शोधताय का?

Air coolers in India : बहुतांश राज्यात बारा महिन्यांपैकी 7 ते 8 महिने उकाळाच जाणवतो. त्यामुळे खर्च आणि विज बिलाच्या दृष्टीकोनातुन तसेच सदैव कुठल्याही रुममध्ये उपयोगात आणता यावा, यासाठी नागरीकांना एअर कूलर वापरणेच सोईस्कर वाटते. आजच्या आधुनिक युगातील एअर कूलर (Modern era air cooler) देखील अत्याधुनिक तंत्रज्ञानाने भरलेले, आरामदायी फिल देणारे आणि पाहिजे तिथे सहज हलविता येणारे म्हणजेच पोर्टेबल असते. तुम्ही जर का उत्तम एअर कूलरचा शोध घेत असाल तर, आज आपण 15 हजार रुपयांपर्यंत विकत घेता येणाऱ्या एअर कूलरची नावे जाणून घेणार आहोत.

Symphony Diet 3D 55i+ पोर्टेबल टॉवर एअर कूलर

सिम्फनी हा भारतातील अग्रगण्य एअर कूलर ब्रँडपैकी एक ब्रँड आहे. यामध्ये निवडायला विविध पर्याय देखील उपलब्ध आहेत. यामध्ये 55 एल पाण्याच्या टाकीचा समावेश आहे. तसेच बर्फे ठेवण्यास एक वेगळा कप्पा दिला आहे. सोबत एक रिमोट देखील दिलेला असतो. Symphony Diet 3D 55i+ या एअर कूलरची किंमत 13,589 रुपये आहे.

Hindware Cruzo 46L एअर कूलर

हिंडवेअर एअर कूलर हे भारतातील सर्वोत्कृष्ट एअर कूलरपैकी एक आहे. यामध्ये 48 एल पाण्याची टाकी उपलब्ध आहे. यामध्ये टाकीत किती पाणी आहे, हे अगदी सामोरच सहज दिसून येते. या कूलरची किंमत 6,134 रुपये आहे.

Bajaj PX 97 टॉर्क नवीन 36L एअर कूलर

बजाज हा भारतातील अग्रगण्य गृहोपयोगी ब्रँडपैकी एक आहे. त्यामध्ये 36 L पाण्याच्या टाकी येते. कुलर मध्ये किती पाणी भरले आहे, हे सहजतेने लक्षात येते. बजाज कंपनीच्या कूलर मध्ये एक एअर फिल्टर पॅड देखील दिले जाते. ज्यामुळे घरातील वाचतावरण बॅक्टेरियामुक्त आणि सुरक्षित ठेवले जाते. बजाजच्या या एअर कूलरची किंमत 5,619 रुपये आहे.

Havells Celia 55 Liter Desert एअर कूलर

हॅवेल्स सेलिया 55 लिटर डेझर्ट एअर कूलर हे भारतातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या सर्वोत्कृष्ट एअर कूलर्सपैकी एक आहे जे शक्तिशाली एअर थ्रोसह येते. यामध्ये फॅन पूढे 16 स्ललाइड असलेले एक मुव्हेबल फळी (plank) दिलेली आहे. त्यामुळे याचा वारा चौफेर पसरतो.  ब्रीद इझी टेक्नॉलॉजी हे या कूलरचे वैशिष्टय आहे. या कूलरची किंमत 10,299 रुपये आहे.

Crompton Optimus 65-Liter Portable Desert एअर कूलर

क्रॉम्प्टन ऑप्टिमस 65-लिटर पोर्टेबल डेझर्ट एअर कूलर हे एक अत्यंत उष्ण वातावरणात सेवा देणाऱ्या कूलर्सपैकी एक आहे. हे कूलर्स ऑटो स्विंग आणि ऑटो ड्रेन फंक्शन्ससह, सुधारीत कूलिंग कार्यक्षमतेसह दूरवर थंड हवा देते. याची किंमत 12,400 रुपये आहे.