Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Best ETF in India : जाणून घ्या भारतात गुंतवणूक करण्यासाठी सर्वोत्तम ETF कोणते?

Top 10 ETF Fund in India

ईटीएफ म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड (Exchange Traded Fund). हा म्युच्युअल फंड सारखाच गुंतवणुकीचा प्रकार आहे. ईटीएफ हे असे फंड आहेत जे शेअर मार्केटमधील इंडेक्सला फॉलो करतात.

भारतात एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETF) करणाऱ्या अनेक एएमसी (AMC) आहेत. त्यामुळे यातून नेमक्या कोणत्या ETF मध्ये गुंतवणूक करायची हे ओळखणं अवघड ठरू शकते. या सर्व एएमसीपैकी बेस्ट ईटीएफ (ETF) कोणता? त्यामध्ये गुंतवणूक कशी करायची? आणि तुम्हाला माहित असणं आवश्यक असलेल्या अनेक गोष्टींची माहिती आपण घेणार आहोत.

एक्सचेंज ट्रेडेड फंड (Exchange Traded Fund-ETF) ही एक सिक्युरिटीजची बास्केट आहे; ज्याची तुम्ही स्टॉक एक्सचेंजवर थेट खरेदी किंवा विक्री करू शकता. ईटीएफ फंड मूलभूत निर्देशांकाचा मागोवा घेतात. ते इंडेक्स म्युच्युअल फंडांसारखेच आहेत; पण त्याची खरेदी-विक्री शेअर्सप्रमाणे शेअर मार्केटमध्ये किंवा स्टॉक एक्सचेंजमध्ये केली जाते. त्यामुळे ईटीएफला स्टॉक आणि म्युच्युअल फंडचे परफेक्ट कॉम्बिनेशन मानले जाते.

प्रकार (Types of ETF)

भारतात गुंतवणुकीसाठी भारतातील टॉप-रँकिंग एक्स्चेंज-ट्रेडेड फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी काही सर्वोत्तम ETF मध्ये निप्पॉन इंडिया ईटीएफ (Nippon India ETF), निफ्टी पीएसयू बँक बीईईएसचा (Nifty PSU Bank BeEs) समावेश आहे. ज्यांनी गेल्या वर्षभरात 22.62 टक्के परतावा दिला आहे. कोटक निफ्टी पीएसयू बँक ईटीएफ (Kotak Nifty PSU Bank ETF)ने एका वर्षात 22.59 टक्के परतावा दिला आहे. तर CPSE ETF ने 14.15 टक्के, ICICI Prudential Bharat 22 ETF ने 14.02 टक्के इतका परतावा दिला आहे. तर ऑक्टोबर महिन्यातले हे भारतातील सर्वोत्तम ETF फंड आहेत.

भारतातील गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम ईटीएफ

image-24.png

Source : https://www.mutualfundindia.com 


एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETF) म्हणजे काय?

ईटीएफ म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड (Exchange Traded Fund). हा म्युच्युअल फंड सारखाच गुंतवणुकीचा प्रकार आहे. ईटीएफ हे असे फंड आहेत जे शेअर मार्केटमधील इंडेक्सला फॉलो करतात. म्युच्युअल फंड आणि ईटीएफ मध्ये मुख्ये फरक म्हणजे ईटीएफ मध्ये रिअल टाइम ट्रेडिंग करता येते. कारण ईटीएफची किंमत मार्केटमधील चढ-उताराप्रमाणे बदलते. तर म्युच्युअल फंडचा एनएव्ही (NAV) दिवसाच्या शेवटी ठरते आणि ती किंमत दुसऱ्या दिवशी लागू होते.