Interest Rates On FD : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) 2022 च्या मे महिन्यापासून व्याजदर वाढवण्यास सुरुवात केली. आरबीआयने व्याजदर वाढवल्यानंतर बहुतेक सर्व बँकांनी एफडीवरील व्याजदर वाढवण्यास सुरुवात केली. बँकांनी व्याजदरात वारंवार वाढ केल्यानंतर, एफडीचे व्याजदरही ग्राहकांना गुंतवणुकीसाठी आकर्षित करत आहेत. देशातील टॉप 10 वर असलेल्या बँका देखील 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या FD स्कीम ऑफर करत आहेत. बँक सर्वसामान्यांना 3 ते 7.50 % व्याज देत आहे. त्याचवेळी ज्येष्ठ नागरिकांना 3.50 ते 7.85 % व्याज देत आहेत.
अॅक्सिस बँक ही एफडीवर 3.5 ते 7.85 % व्याज देत आहे. पंजाब नॅशनल बँक ही एफडीवर 3.50 % ते 7.50 % व्याज देत आहे. तर ICICI बँक 3 ते 7.6 % व्याज देत आहे. या सर्व बँका 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या FD स्कीम ऑफर करत आहेत.
Table of contents [Show]
SBI बँक
एसबीआय बँक सामान्य ग्राहकांना 3 ते 7.10 % व्याज देत आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना 3.50 ते 7.60 % व्याज देत आहे.
HDFC बँक
एचडीएफसी बँक सामान्य ग्राहकांना 3 ते 7.25 % व्याज देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना 3.50 ते 7.75 % व्याज देत आहे.
ICICI बँक
आयसीआयसीआय बँक सामान्य ग्राहकांना 3 ते 7.10 % व्याज देत आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना 3.50 ते 7.60 % व्याज देत आहे.
PNB बँक
पीएनबी बँक सामान्य ग्राहकांना 3.50 ते 7.25 % व्याज देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना 4 ते 7.75 % व्याज देत आहे.
Axis बँक
अॅक्सिस बँक सामान्य ग्राहकांना 3.50 ते 7.10 % व्याज देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना 3.50 ते 7.85 % व्याज देत आहे.
Canara बँक
कॅनरा बँक सर्वसामान्य ग्राहकांना 4 % ते 7.25 % व्याज देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना 4 ते 7.75 % व्याज देत आहे.
Kotak Mahindra बँक
कोटक महिंद्रा बँक सामान्य ग्राहकांना 2.75 ते 7.20 % व्याज देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना 3.25 ते 7.70 % व्याज देत आहे.
Union बँक
युनियन बँक सामान्य ग्राहकांना 3 ते 7 % व्याज देत आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना 3.50 % ते 7.50 % व्याज देत आहे.
Yes बँक
येस बँक सामान्य ग्राहकांना 3.25 ते 7.50 % व्याज देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना 3.75 ते 8.25 % व्याज देत आहे.
बँक ऑफ बडोदा सामान्य ग्राहकांना 3 ते 7.25 % व्याज देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना 3.50 ते 7.55 % व्याज देत आहे.