• 27 Mar, 2023 06:02

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Vodafone-Idea Recharge Plan: जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहचवण्यासाठी वोडाफोन-आयडियाने लॉन्च केला 30 दिवसांचा प्रीपेड

VI Recharge

Vodafone-Idea Recharge Plan: देशात सध्या Reliance jio , Airtel आणि Vodafone-Idea हे तीन आघाडीचे प्लेयर्स पाहायला मिळत आहेत. यांच्या मधील स्पर्धा इतकी वाढली आहे की, जास्तीत जास्त ग्राहक मिळवण्यासाठी वोडाफोन-आयडियाने 30 दिवसांचा प्रीपेड प्लॅन लॉन्च केला आहे.

भारतात सध्या Reliance jio , Airtel आणि Vodafone-Idea या तीन आघाडीच्या प्रमुख टेलिकॉम कंपन्या आहेत. आजच्या घडीला जिओ आणि एअरटेल प्रमाणे VI कंपनीने अजून पर्यंत 5 जी सेवा सुरु केलेली नाही. महत्त्वाचं म्हणजे जिओ आणि एअरटेलच्या तुलनेत Vi च्या वापरकर्त्यांची संख्या देखील फारच कमी आहे. त्यामुळे या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आणि आपल्या ग्राहकांची संख्या वाढवण्यासाठी 30 दिवस वैधता असणारा प्रीपेड प्लॅन VI कंपनीने लॉन्च केला आहे. चला तर याबद्दल जाणून घेऊयात.  

296 रुपयाच्या प्लॅनमध्ये काय मिळेल?

वोडाफोन-आयडियाने ग्राहकांसाठी सादर केलेला 30 दिवसांच्या वैधतेचा प्रीपेड प्लॅन हा केवळ 296 रुपयांचा आहे. प्रतिस्पर्धी रिलायन्स जिओ आणि एअरटेलकडे 296 रुपयांचा प्लॅन आधीपासूनच उपलब्ध आहेत. Vodafone Idea च्या 296 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना 25 जीबी डेटा पुरवण्यात येणार आहे. तसेच या प्लॅनची वैधता ही संपूर्ण एक महिना म्हणजेच 30 दिवसांसाठी असणार आहे. वापरकर्त्यांना या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि 100 एसएमएस (SMS) दररोज मिळणार आहेत. या प्रीपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना Vi म्युझिक आणि टीव्ही अ‍ॅपवर मोफत प्रवेश मिळणार आहे.

296 रुपयाच्या प्लॅन व्यतिरिक्त कोणते प्लॅन आहेत?

296 रुपयांच्या प्रीपेड प्लॅन व्यतिरिक्त Vodafone कडे 30-31 दिवसांच्या वैधतेसह 2 रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहेत. 195 रुपयांच्या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना 3 जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि महिन्याला 300 एसएमएस करण्याची सुविधा मिळणार आहे.

319 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये कंपनी वापरकर्त्यांना अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग सुविधा देणार आहे. याशिवाय 2 जीबी डेटा आणि दररोज 100 एसएमएस पाठवण्याची सुविधा कंपनी देणार आहे. यामध्ये डेटा डिलाइट्स, वीकेंड डेटा रोलओव्हर सुविधा, Vi मुव्ही आणि टीव्ही अ‍ॅपवर वापरकर्त्यांना मोफत प्रवेश मिळणार आहे.

296 रुपयांच्या प्लॅनमध्ये इतर कंपन्या काय फायदे देतायेत?

Jio, Airtel आणि Vodafone-Idea च्या 296 रुपयांच्या रिचार्ज पॅकमध्ये 30 दिवसांसाठी 25 जीबी डेटा मिळणार आहे. मात्र असे असले, तरीही एअरटेल आणि जिओच्या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना कॅशबॅक, विंक म्युझिक अ‍ॅपचे मोफत सब्स्क्रिप्शन आणि जिओ अ‍ॅप यासारखे अतिरिक्त फायदे मिळत आहेत. सर्वात महत्त्वाचा फरक म्हणजे वोडाफोन-आयडियामध्ये 4 जी सेवा दिली जाते, तर एअरटेल आणि जिओमध्ये 5 जी सर्व्हिस देण्यात येते.