'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) हा प्रसिद्ध टीव्ही शो गेल्या 14 वर्षांपासून सुरू आहे. त्यातील एक मुख्य पात्र शैलेश लोढा याने सहा महिन्यांपूर्वी शो सोडला आहे. त्यानंतर बातम्या येत आहेत की निर्मात्यांनी त्याला जवळपास वर्षभर पैसे दिलेले नाहीत. या बातमीनंतर आता शोच्या निर्मात्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
शोचे प्रोजेक्ट हेड सुहेल रमाणी यांनी या प्रकरणी मीडियाशी बोलताना हे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. इतकंच नाही तर उलट त्यांनी शैलेश लोढा यांच्यावर आरोप केला की त्यांनी कागदपत्रांवर सही केली नाही. त्याच्याशी अनेकवेळा संपर्क करण्यात आला, तरीही तो ना पेमेंट घेण्यासाठी आला ना सही करण्यासाठी. ई-टाइम्सशी बोलताना सुहेलने सांगितले की, त्याने शैलेशला अनेकदा सांगितले आहे की करार संपवण्यासाठी त्याला कागदपत्रांवर सही करावी लागेल. त्यानंतर त्यांना त्यांचे पेमेंट मिळेल. पण शैलेश आला नाही.
शोच्या प्रोजेक्टचे म्हणणे काय?
शोच्या प्रोजेक्टने पुढे सांगितले की, कोणतीही कंपनी असो किंवा शो, ते सोडताना अनेक नियमांचे पालन करावे लागते. टिम आणि स्टाफमधील लोकांची औपचारिकता पूर्ण करावी लागते. त्यानंतर कंपनी आपले पैसे देते. प्रोजेक्टने सांगितले की शैलेशने अचानक शो सोडला, त्याने ना कोणती सूचना दिली ना कोणाला सांगितले. त्यामुळे निर्माते आणि त्यांच्यात वाद निर्माण झाला आहे.
नेहा मेहता यांनीसुद्धा केला होता आरोप
या शोमध्ये तारक मेहताच्या पत्नीची भूमिका साकारणाऱ्या नेहा मेहता, अंजली भाभी यांनीही अनेक वर्षांपूर्वी शो सोडला होता. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, मला 6 महिन्यांपासून पैसे मिळालेले नाहीत. यासाठी तिने अनेकदा फोनही केले, मात्र पैसे दिलेले नाहीत. ‘दया’ ही भूमिका साकारणाऱ्या दिशा वकानीनेही निर्मात्यांशी झालेल्या मतभेदामुळे शो सोडल्याचे बोलले जात आहे.