Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tips for Money from Friends: मित्र मागून ही उधारीचे पैसे रिटर्न करत नाही, मग वापरा ‘या’ शक्कल!

Tips for Borrowing Money from Friends

How To Get Borrowed Money Back: उधार पैसा हा आयुष्यातील सर्वात मोठा अविभाज्य भाग आहे म्हणण्यास हरकत नाही. मित्राची उधारी आता तर जोक्सचा भाग बनला आहे. यावर अनेक व्हिडीओ सोशलमिडीयावर पाहायला मिळतात. किती ही मित्राला पटवल तरी मित्र काय उधारीचा पैसा देण्यास लवकर तयार होत नाही, अशाच काही मित्रांकडून पैसे कसे रिटर्न मिळवायचे यासाठी काही ट्रिक्स पाहूयात.

सध्या मित्रांना दिलेला उधार पैसा वेळेत येईल याची काही गॅरंटी नसते. पैसा मागून ही मित्र उधारीचे पैसे काय रिटर्न करीत नाही. हा उधार पैसा रिटर्न मिळविण्यासाठी काही शक्कल लढवुयात.

मित्राला पैशाची गरज हे पटवून द्या

खरंच तुम्हाला पैशांची खूपच गरज आहे, हे आपल्या मित्राला पटवून द्या. यासाठी तुम्ही त्याला काही कागदपत्रेदेखील प्रुप म्हणून दाखवू शकता. पण तत्पुर्वी एक लक्षात ठेवा, उधार पैसे दिलेल्या आपल्या मित्राला फोनवरून किंवा मॅसेजनव्दारे या गोष्टी सांगू नका. त्याला प्रत्यक्षात समारोसमोर भेटून, तुम्हाला पैशांची का गरज आहे, हे त्याला पटवून द्या. जेणेकरून त्याला वाईटदेखील वाटणार नाही आणि तुमचे उधार दिलेले पैसेदेखील तुम्हाला रिटर्न मिळेल.  

पैसे हप्त्यावर घेण्याचे नियोजन

जर तुम्ही आपल्या मित्राला मोठी रक्कम उधारीवर दिली असेल, तर यासाठी पैसे रिटर्न मिळविण्यासाठी पैसे हप्त्यावर घेण्याचे योग्य नियोजन करा. मित्राला प्रत्यक्षात भेटून त्याला हे नियोजन सांगा. त्याला पटवून द्या की आपण यासाठी ठराविक हप्ता ठेवू, जेणेकरून तुला ही एकदम पैसे देण्यास जड होणार नाही. तुम्हाला ही तुमचे पैसे वेळेत व संपूर्ण मिळेल. सोबतच तुमची मैत्रीदेखील उत्तम राहीन.

मित्रांच्या मदतीने मिळवू शकता पैसे

तुमच्या दोघांचा कोणी एक कॉमन मित्र असेल, तर त्याच्या कानावर हे टाका. त्याला सांगा की, उधार घेतलेल्या मित्राला पैसे रिटर्न करण्याबाबत समजावून सांगा. मला पैशांची खूप आवश्यकता आहे किंवा त्या मित्राच्या कुटुंबासोबत स्पष्टपणे उधारीबाबत बोला. जेणेकरून तुम्हाला उधारीचे संपूर्ण पैसे रिटर्न मिळण्यास मदत होईल.

कर्ज घेण्यास भाग पाडा

मित्राला मोठी रक्कम उधार दिली असेल आणि ही रक्कम रिटर्न मिळत नाही. तुम्हाला ही पैशांची खूप गरज आहे, अशावेळी तुमच्या उधार दिलेल्या मित्राला कर्ज घेण्यास भाग पाडा. त्याला बँकांच्या कर्ज योजना समजावून सांगा. जेणेकरून तो कर्ज घेऊन शकेल व त्यानंतर तुम्हाला तुमचा पैसा रिटर्न करून शकेल.

मित्राची किंमती वस्तू तुमच्याकडे ठेवा

जोपर्यंत मित्राला दिलेली उधारीची रक्कम मिळत नाही, तोपर्यंत तुमच्या मित्राची एखादी किंमती वस्तू तुमच्याकडे ठेवा. मित्राला स्पष्टपणे सांगा की, घरचे पैशांसाठी वारंवार मागणी करत आहे. यासाठी तू तुझ्या घर, जमिन किंवा गाडीची कागदपत्रे माझ्याकडे ठेवायला दे. जेणेकरून मला त्यांना दाखविता येईल. या शक्कलने तुमचा मित्र ही कागदपत्रे परत मिळविण्यासाठी उधार पैसे रिटर्न करण्याचा प्रयत्न करेल. सोबतच तुमच्या मैत्रीच्या नात्यांवरदेखील याचा परिणाम होणार नाही.