iPhone 12 Discontinued : नामांकित कंपनी Apple कडून iPhone 15 लाँच करण्याची तयारी सुरू आहे. अशातच ऍपल आपला 3 वर्ष जुना आयफोन बंद करणार अशी चर्चा सुरू आहे. 3 वर्ष जुना आयफोन म्हणजेच iPhone 12. नवीन आयफोन लाँच करत असल्याने Apple च्या इतर iPhones जसे iPhone 13 आणि iPhone 14 स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली जाऊ शकते. त्यामुळे आता ग्राहकांसाठी ही सुवर्णसंधी आहे.
स्वस्तात खरेदी करू शकता
जर तुम्ही iPhone 12 खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही सर्वोत्तम संधी आहे, कारण Apple Store वर iPhone 12 बंद करण्यात आला आहे. परंतु ते Appleच्या अधिकृत डीलर स्टोअरमधून खरेदी केले जाऊ शकते, जेथे iPhone 12 चा मर्यादित स्टॉक विक्रीसाठी उपलब्ध आहे. स्टॉक मर्यादित असल्याने कमी किंमतीत दिला जात आहे. Apple ने iPhone 12चे उत्पादन आधीच बंद केले असल्याची माहिती मिळाली आहे. iPhone 12 सध्या काही निवडक डीलर स्टोअरमध्ये उपलब्ध असल्याने तुम्ही कमी किंमतीमध्ये खरेदी करू शकता.
सर्वाधिक विकले जाणारे आयफोन्स
सध्या iPhone SE 2022, iPhone 12, iPhone 13 mini, iPhone 13, iPhone 14, iPhone 14 Plus, iPhone Pro आणि iPhone Pro Max Apple Store वरून विकले जात आहेत. Apple iPhone 14 मॉडेलची निर्मिती करत नाही. यापैकी अनेक मॉडेलवर तुम्हाला सूट मिळू शकते.
ही मॉडेल्स बंद केली जाऊ शकतात
Apple कडून iPhone 15 लाँच करताना iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max बंद केले जाऊ शकतात, कारण Apple गेल्या काही वर्षांपासून एक वर्ष जुने Pro आणि Pro Max बंद करत आहे. यासोबतच iPhone 13 Mini आणि iPhone 14 Plus देखील बंद केले जाऊ शकतात.
Source : navbharattimes.indiatimes.com