Personal Loan : सगळ्या गोष्टी येऊन पैशांजवळच थांबतात. त्यामुळे माणसाजवळ पैसा नसला आणि तातडीचा प्रसंग उद्भवल्यास पैसा जमा करणे, खूप अवघड होऊन जाते. अशावेळी बँकेतून तुम्ही वैयक्तिक कर्ज मिळवू शकता. पण, त्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची पूर्तता करावी लागते. ती केल्यास, तुम्हाला त्वरित कर्ज मिळू शकते. त्यामुळे तुम्हाला ही वैयक्तिक कर्ज घ्यायचे असल्यास, त्या गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे. नाहीतर बॅंक तुमच्या कर्जाचा अर्ज रिजेक्ट करू शकते.
Table of contents [Show]
क्रेडिट स्कोअर मेंटेन करा
तुमचा क्रेडिट स्कोअर 300 आणि 900 च्या दरम्यान नसल्यास, तो खराब समजल्या जातो. त्यामुळे तुमच्या कर्जाचा अर्ज रिजेक्ट होऊ शकते. तसेच, तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला नसताना ही बँकेने तुम्हाला कर्ज दिल्यास, त्यावर बँक जास्त व्याजदर आकारू शकते. त्यामुळे जास्त व्याजदारावर लोन घेतल्यास, तुम्हाला ते फेडण्यासाठी अधिक समस्या येऊ शकतात. तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला कर्ज मिळवायला अ़डचण येत नाही. 750 किंवा त्यापेक्षा जास्त स्कोअर असल्यास तो चांगला क्रेडिट स्कोअर मानल्या जातो.
वेगवेगळ्या ठिकाणी कर्जासाठी अर्ज करा
तुम्ही एकाचवेळी वेगवेगळ्या बँका किंवा वित्तीय संस्थांमध्ये कर्जासाठी अर्ज केल्यास, तुमचा अर्ज रिजेक्ट केल्या जाऊ शकतो. कारण, बँक तुम्ही लोनसाठी कुठे अर्ज केला आहे का याची चौकशी करते आणि यासाठी क्रेडिट ब्युरोकडून तुमचा क्रेडिट रिपोर्ट मागवून घेते. त्यांना जर तसे आढळल्यास, तुमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण होऊ शकतो. यासाठी वैयक्तिक कर्ज घेताना एकाच कर्ज देणाऱ्या संस्थेकडून कर्ज घेणे योग्य ठरू शकते. त्यामुळे अर्ज करण्याच्या आधी इतर कुठे अर्ज केला नसल्याची खात्री करूनच कर्जाचा अर्ज करा.
तुमच्या उत्पन्नाची पाहणी होऊ शकते
तुम्हाला कर्ज देण्याच्या आधी बँक तुम्ही ते परत करू शकता की नाही याची पाहणी करते. यासाठी बँक तुमचे उत्पन्न तपासते. त्यात जर त्यांना समजले की अर्जदार वेळेवर EMI परत करू शकतो. तेव्हाच बँक तुम्हाला कर्ज देते. त्यांना जर तुम्ही EMI फेडण्यास अक्षम वाटल्यास, ते तुमचा अर्ज रिजेक्ट करू शकतात. त्यामुळे अर्ज करण्याआधी तुम्हाला बँक रिजेक्ट करण्याची शक्यता वाटत असल्यास, तुम्ही बँकेच्या कर्मचाऱ्यांशी बोलू शकता.
सतत नोकरी बदलणे टाळा
तुम्ही जर सतत नोकरी सोडत असल्यास, तुम्हाला कर्ज मिळवण्यात अडचणी येऊ शकतात. कारण, वैयक्तिक कर्ज देताना बँक तुमच्या नोकरीच्या स्थिरतेचे रेकाॅर्ड चेक करते. त्यामुळे तुम्हाला या गोष्टीवरही लक्ष ठेवावे लागणार आहे. तुम्हाला जर नोकरी नसेल आणि तुम्ही वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करायचे ठरवल्यास बँक तुमचा अर्ज रिजेक्ट करू शकते. कारण, बेरोजगारांना लोन देणे बँकेला जोखमीचे वाटते. याचबरोबर तुम्ही एखाद्या कंपनीत काम करण्याचा तुम्हाला 3 वर्षांचा अनुभव असल्यास, बँक तुमच्या लोनला त्वरित मंजूरी देऊ शकते.