स्वतः कमवते झालो की आपली स्वतःची एक चारचाकी असावी असे स्वप्न आपल्यापैकी अनेकांचे असते. जसे कोणीतरी म्हटले आहे की, यश मिळवणे कठीण आहे पण ते टिकवणे हे त्याहून कठीण आहे हीच बाब तुमच्या कारसारख्या असेट्सलासुद्धा लागू होते. त्यामुळेच गरजेच्या वेळी तुमच्याकडे कार विमा असणे महत्त्वाचे आहे. जेव्हा गरज असेल तेव्हा फायदे मिळवण्यासाठी चांगली कार विमा पॉलिसी असणे आवश्यक आहे. पण त्यासोबतच कार विम्याचे नुतनीकरण करणे हे तितकेच कठिण आहे.
Table of contents [Show]
- मोटार विम्याचे नुतनीकरण करण्यापूर्वी ‘या’ गोष्टींचा विचार करा
- वेळेत पॉलिसीचे नुतनीकरण (Renewal of Policy In Time)
- पर्यायांचा विचार न करता नुतनीकरण (Renewal Without Consideration of Alternatives)
- योग्य प्रकारच्या पॉलिसीची निवड न करणे (Not Choosing the Right Type of Policy)
- योग्य माहिती अपडेट करणे (Updating the Correct Information)
मोटार विम्याचे नुतनीकरण करण्यापूर्वी ‘या’ गोष्टींचा विचार करा
वेळेत पॉलिसीचे नुतनीकरण (Renewal of Policy In Time)
योजनेचा/पॉलिसीचा पूर्ण लाभ घेण्यासाठी वेळेवर पॉलिसीचे नूतनीकरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. Netflix किंवा Amazon प्रमाणेच, जेव्हा तुम्ही नूतनीकरण करण्यात अयशस्वी होता, तेव्हा ते अपग्रेड सबस्क्रिप्शन चिन्ह दाखवते; त्याचप्रमाणे, कार विम्याचेही आहे. एका रद्द झालेल्या विम्यामुळे तुम्हाला ट्रॅफिक दंड, आणि जमा झालेल्या फायद्यांचे नुकसान सहन करावे लागेल.
पर्यायांचा विचार न करता नुतनीकरण (Renewal Without Consideration of Alternatives)
कार विमा खरेदी करणे महत्त्वाचे आहे परंतु उपलब्ध सर्वोत्तम पर्यायांचा विचार केल्यानंतर तो खरेदी करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. पॉलिसी खरेदी करताना घाईघाईने निर्णय घेतला असला तरीही, नुतनीकरणा दरम्यान तो सुधारण्याची संधी असते. याव्यतिरिक्त, सर्व पर्याय जाणून घेतल्याने तुम्हाला कमी प्रिमीयम आणि सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्यांसह चांगला कार विमा घेण्याची संधी मिळते.
योग्य प्रकारच्या पॉलिसीची निवड न करणे (Not Choosing the Right Type of Policy)
कार विम्यासाठी मुख्यतः दोन प्रकारच्या पॉलिसी उपलब्ध आहेत. थर्ड पार्टी पॉलिसी आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी. कार विमा घेण्यापूर्वी एखाद्याच्या गरजेचे अयोग्य मूल्यमापन झाल्यास, एखादी व्यक्ती अशी पॉलिसी निवडू शकते जी त्याच्या गरजांनुसार नसते किंवा सर्वंकष विमा कवच मिळत नाही. त्यामुळे तुम्हाला कोणत्या पॉलिसी फिचर्सचा समावेश करायचा आहे, हे जाणून घेणं आणि त्यानुसार इन्शुरन्स पॉलिसीचा निर्णय घेणं गरजेचं आहे.
योग्य माहिती अपडेट करणे (Updating the Correct Information)
जेव्हा तुम्हाला पॉलिसीच्या वैशिष्ट्यांचा लाभ घ्यायचा असतो, तेव्हा तुमची सर्व माहिती, जसे की पत्ता, फोन नंबर इत्यादी विमा कंपनीकडे अपडेट ठेवणे देखील खूप महत्वाचे आहे. म्हणून एखाद्याची वैयक्तिक माहिती योग्य आहे याची खात्री करण्याबरोबरच अपडेट करणे देखील तितकेच आवश्यक आहे.