Electric Vehicle Insurance: देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांची (EV) खरेदी वाढली आहे. त्याचबरोबर ईव्ही वाहनांच्या खरेदीवर सरकारकडून सबसिडी दिली जाते. तसेच ही वाहने इको-फ्रेंडली असण्यासोबतच त्याला maintenance costs सुद्धा कमी आहे. तसेच या गाड्यांची बॅटरी घरच्या घरी किंवा चार्जिंग स्टेशनवर अगदी कमी खर्चात चार्ज करता येते.
2030 पर्यंत भारताला इलेक्ट्रिक वाहनांसाठी एक प्रमुख बाजारपेठ बनवण्यासाठी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देणे सुरू आहे. इलेक्ट्रिक कार खरेदी करण्यासाठी कर्ज देखील दिले जात आहे. ज्यावर सरकारकडून 1.5 लाख रुपयांपर्यंत सवलत दिली जात आहे.
सरकारी आकडेवारीनुसार, 2021 मध्ये एकूण 3.11 लाख इलेक्ट्रिक वाहने विकली गेली आणि 2022 मध्ये हा आकडा 4.19 लाखावर गेला. त्यामुळे ईव्ही गाड्यांच्या विम्याची मागणीही वाढली आहे. EV गाड्यांच्या विम्यामध्ये अपघाती नुकसान, आग, नैसर्गिक आपत्ती, दंगल आणि इतर प्रकारच्या नुकसानांचा समावेश होतो. अशा परिस्थितीत जर तुम्ही EV गाडीवर विमा घेण्याचा विचार करत असाल, काही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात.
Table of contents [Show]
ईव्हीसाठी विमा घेताना या गोष्टी लक्षात ठेवा
जर तुम्ही EV साठी विमा घेत असाल, तर इलेक्ट्रिक वाहन विम्यामध्ये पूर्ण कव्हर मिळवण्याचा प्रयत्न करा. ज्यामध्ये संपूर्ण वाहन बॅटरीपासून कव्हर केले जात आहे. बाजारात अनेक कंपन्यांकडून विमा ऑफर केला जातो. त्यामध्ये तुलना करा आणि स्वस्त प्रीमियममध्ये अधिक विमा संरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न करू शकता. जर तुम्हाला फक्त EV मधील बॅटरीचा विमा उतरवायचा असेल, तर तुम्ही वाहनाच्या विम्यासोबत अॅड ऑन म्हणून बॅटरी कव्हर करू शकता. वाहनाच्या प्रकारानुसार विम्याच्या प्रीमियमची रक्कम बदलू शकते.
कव्हरेज
डिझेल-पेट्रोल वाहनांपेक्षा इलेक्ट्रिक वाहने महाग असल्याने, पुरेसे कव्हरेज असलेली पॉलिसी घेणे गरजेचे आहे. इन्शुरन्स पॉलिसीतील Own Damage कव्हरेजमुळे अपघात, नैसर्गिक आपत्ती, दंगल आणि आगीमुळे होणाऱ्या गाड्यांचे नुकसान किंवा चोरी झाल्यास बिलांच्या दुरुस्तीमध्ये फायदा मिळू शकतो.
इन्शुरन्स डिक्लेअर मूल्य
विमाधारक घोषित मूल्य म्हणजे इन्शुरन्स डिक्लिअर्ड मूल्य (IDV) जितके जास्त असेल तितका प्रीमियम जास्त असतो. परंतु कोणतंही नुकसान झाल्यास जास्तीची IDV तुम्हाला अधिक भरपाई मिळवून देते. इलेक्ट्रिक वाहने महाग असल्याने जास्तीची IDV असलेली पॉलिसी घेतल्याने अधिक क्लेम मिळू शकतो.
प्रीमियम
प्रीमियम भरताना तुम्हाला कोणतीही गैरसोय होणार नाही अशा पद्धतीने निवडा. परवडणाऱ्या प्रीमियम वर जास्तीत जास्त कव्हरेज देऊ शकणाऱ्या पॉलिसीची निवड करा.
क्लेम सेटलमेंट प्रमाण
विमा पॉलिसी खरेदी करताना क्लेम सेटलमेंट रेशो हा एक महत्त्वाचा पॅरामीटर ठरतो. कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो कसा आहे हे पाहणे महत्त्वाचे आहे. एखाद्याने नेहमी अशा कंपनीकडून विमा पॉलिसी खरेदी केली पाहिजे जिथे क्लेम सेटलमेंट रेशो सर्वाधिक आहे.