Agriculture Sector Jobs : मनुष्याच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी पैसा महत्वाचा ठरतो. प्रत्येक व्यक्तीला नोकरी आणि चांगल्या पगाराची गरज असते. आपल्याला एखाद्या क्षेत्रात खूप आवड असते पण त्यात करिअर ऑप्शन आहेत की नाही हेच आपल्याला माहित नसते. आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी आपल्याला त्याबाबत सर्व माहिती असणे आवश्यक आहे. तुम्हाला जर कृषी क्षेत्रात आवड असेल तर पुढील करिअर ऑप्शन तुमच्यासाठी बेस्ट असू शकतात.
कृषी इंजिनिअर
दरवर्षी लाखो विद्यार्थी बीटेक करतात, पण तुम्ही कधी एखाद्या विद्यार्थ्याकडून कृषी क्षेत्रात बीटेक केल्याचे ऐकले आहे का? तुम्हाला हवे असेल तर तुम्ही कृषी क्षेत्रात engineer होऊन चांगले पैसे कमवू शकता. या सोबतच तुम्ही कॉम्प्युटर एडेड टेक्नॉलॉजी देखील शिकू शकता आणि याद्वारे तुम्ही शेतीशी संबंधित एकापेक्षा जास्त मशीन तयार करू शकता.
जर तुम्हाला कृषी क्षेत्रात engineer बनायचे असेल, तर तुमच्याकडे गणित आणि भौतिकशास्त्र (Mathematics and Physics) चांगले असले पाहिजे, कारण याच्या मदतीने तुम्ही एकापेक्षा जास्त मशीन बनवू शकता. कृषी इंजिनिअरला दरमहा 30 ते 50 हजार रुपयांपर्यंत पगार मिळतो.
फार्म मॅनेजर
ही नोकरी सध्या काही मेट्रो सिटीमध्ये आणि परदेशात उपलब्ध आहे. या नोकरीअंतर्गत तुम्हाला कोणाची तरी शेती सांभाळावी लागेल. फार्म मॅनेजर असल्याने, तुम्हाला शेतीच्या बजेट पॅरामीटर्सशी संबंधित व्यावसायिक निर्णय घेणे आवश्यक आहे.
यासोबतच तुमच्याकडे फार्म मॅनेजरचे काम आहे की शेतातून उत्पादित केलेली उत्पादने बाजारात विकून शेतमालकाला भरपूर नफा मिळू शकतो. फार्म मॅनेजरचा पगार अनुभवावर अवलंबून असतो. 2 वर्षाचा अनुभव असल्यास 30 ते 35 हजार रुपये प्रति महिना असा पगार मिळतो.
कृषी अर्थशास्त्रज्ञ
जर तुम्ही कॉमर्स शाखेतून असाल तर तुम्ही कृषी engineer न होता कृषी अर्थतज्ज्ञ होऊ शकता. या नोकरीत पगार भक्कम आहे, यासोबत तुम्ही फ्रीलान्सिंगही करू शकता. तुम्ही अनेक वेळा पाहिलं असेल की कृषी अर्थतज्ज्ञ टीव्ही चॅनेलवर किंवा वादविवादाच्या पटलावर बसून शेतकऱ्यांबद्दल बोलत असतात आणि त्यांच्या आर्थिक प्रश्नांवर चर्चा करत असतात. अशात त्यांना भरपूर पैसे दिले जातात. कृषी अर्थशास्त्रज्ञला दरमहा 50 ते 60 हजार रुपयांपर्यंत पगार मिळतो.
Source : www.abplive.com