Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Upcoming Cars: एप्रिल महिन्यात कार प्रेमींच्या भेटीला येतील 'या' बजेट कार; EV मध्ये होतील दोन नवीन पर्याय उपलब्ध

Upcoming Cars in april

Upcoming Cars: एप्रिल महिना हा कार प्रेमींसाठी अत्यंत खास असणार आहे . विविध फीचर्ससह काही उत्तम कार्स या महिन्यात लाँच होणार आहेत. यात फ्रॉन्क्स, एमजी कॉमेट ईव्ही, सिट्रोएन सी3 एअरक्रॉस, मर्सिडीज-एमजी कॉमेट या गाड्यांचा समावेश आहे.

एप्रिल महिना हा कार प्रेमींसाठी अत्यंत खास असणार आहे . विविध फीचर्ससह काही उत्तम कार्स या महिन्यात लाँच होणार आहेत. यात  फ्रॉन्क्स, एमजी कॉमेट ईव्ही, सिट्रोएन सी3 एअरक्रॉस, मर्सिडीज-एमजी कॉमेट या गाड्यांचा समावेश आहे.  नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला, विविध किंमतींच्या श्रेणीत अनेक गाड्या लाँच होणार आहेत. या महिन्यात भारतीय बाजारपेठेत लाँच होणाऱ्या टॉप कार्स बद्दल आपण जाणून घेणार आहोत

Maruti Suzuki फ्राँक्स (Maruti Suzuki Fronks)

एप्रिल महिन्यात नवीन मारुती सुझुकी फ्राँक्स ही कार लॉन्च होणार आहे.  मारुतीच्या या नवीन कारमध्ये 1.0-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात येणार आहे. हे इंजिन 98.6 bhp पॉवर आणि 147.6 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि 6-स्पीड AT या दोन व्हेरियंट मध्ये उपलब्ध आहे. प्रत्येक मॉडेलमध्ये 1.2-लिटर एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन निवडण्याचा पर्याय देखील देण्यात आला आहे. हे इंजिन 88.5 bhp पॉवर आणि 147.6 Nm टॉर्क जनरेट करते.

MG कॉमेट EV (MG Comet EV)

एप्रिल महिन्यात, MG Motor India (MG Motor India) आपली कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे. मोठ्या कालावधीनंतर कंपनीचे न्यू लॉन्चिंग असेल. नवीन MG COMET EV 25 kWh बॅटरीद्वारे काम करेल. ही इलेक्ट्रिक कार 38 bhp ची पॉवर जनरेट करण्यास सक्षम असेल. एमजीची ही कार 150 किमी प्रति चार्ज रेंज देईल.

Citroen एअरक्रॉस C3 (Citroen Aircross C3)

Citroen भारतीय बाजारपेठेत कंपनीची नवी 3-रो SUV लाँच करणार आहे. C3 Aircross असे या गाडीचे नाव असणार आहे,  27 एप्रिल रोजी या गाडीचे लॉन्चिंग केले जाणार आहे. Citroen C3 Aircross मध्ये 1.2-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन असेल. हे इंजिन 109 bhp पॉवर आणि 190 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल. मॅन्युअल इंजिनसह मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय या गाडीत उपलब्ध असेल.

बजेट कारसोबतच एप्रिल महिन्यात काही प्रीमियम श्रेणीतील कार देखील लॉंच होणार आहेत.  या गाड्यांची किंमत कोटींच्या घरात आहे. यात मर्सडीज एएमजी 63 एस ई व लॅम्बोर्गिनी उरूस या गाड्यांचा समावेश असेल. 

www.financialexpress.com