Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Top 5 Youtubers in India: भारतातील सर्वाधिक कमाई करणारे 'हे' आहेत 5 यूट्यूबर्स

Top 5 Highest Earning Youtubers in india

Top 5 Highest Earning Youtubers in india: भारतात सध्याच्या घडीला 467 मिलियन युजर्स यूट्यूबवर (Youtube) सक्रिय आहेत. याच माध्यमातून अनेक क्रिएटर्स स्वतःचा आशय तयार करून त्यातून लाखोंची कमाई करत आहेत. किंबहुना आपण कित्येक क्रिएटर्सना फॉलो करून त्यांचे व्हिडीओ सुद्धा पाहत असतो. पण तुम्हाला देशातील टॉप 5 यूट्यूबर्स कोण आहेत आणि त्यांची कमाई किती याबद्दल माहिती आहे का? चला आजच्या लेखातून याबद्दल जाण

यूट्यूब हे जगातील सर्वात मोठे सोशल मीडियावरील व्हिडीओ शेअरिंग प्लॅटफॉर्म (Video Sharing Platform) आहे. भारतात सध्याच्या घडीला 467 मिलियन युजर्स यूट्यूबवर (Youtube) सक्रिय आहेत. याच माध्यमातून अनेक क्रिएटर्स स्वतःचा आशय तयार करून त्यातून लाखोंची कमाई करत आहेत. अनेकजण तर नोकरीधंदा सोडून पूर्णवेळ यूट्यूबवर काम करताना पाहायला मिळत आहेत. किंबहुना आपण प्रत्येकजण यूट्यूबवर एकातरी क्रिएटरला फॉलो करतो आणि त्याचे व्हिडीओ पाहत असतो. पण तुम्हाला भारतातील टॉप 5 यूट्यूबर्स आणि त्यांच्या कमाईबद्दल माहिती आहे का? आजच्या लेखातून याबद्दल जाणून घेऊयात.

भारतातील टॉप 5 यूट्यूबर्स आणि त्यांची कमाई

ceoreviewmagazine.com या वेबसाईटने भारतातील टॉप 5 यूट्यूबर्स आणि त्यांच्या कमाईबद्दल माहिती दिली आहे. या माहितीनुसार देशातील पहिले पाचही यूट्यूबर्स हे पुरुष आहेत, ज्यांचे व्हिडीओ आपण एकदा तरी नक्कीच पाहिले असतील.

अजय नगर (Carry Minati)

Carry Minati
www.indipu.in

भारतातील सर्वाधिक लोकप्रिय आणि श्रीमंत यूट्यूबर्सच्या यादीत अजय नगर म्हणजेच Carry Minati चा पहिला क्रमांक लागतो. कॉमेंट्री आणि कॉमेडी आशयाला घेऊन तो व्हिडीओ बनवतो. अजयने वयाच्या 21 व्या वर्षी यूट्यूब चॅनेल सुरु केले आणि केवळ 3 वर्षात 10 मिलियन सबस्क्राइबर आणि 2 बिलियन Viewer मिळवण्यात त्याला यश मिळवले. सध्या त्याचे यूट्यूबवर 38.2 मिलियन्स सबस्क्राइबर आहेत.

यूट्यूब व्यतिरिक्त त्याचे इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 2 मिलियनहून अधिक फॉलोवर्स आहेत. एक स्पॉन्सर्ड पोस्ट करण्यासाठी अजय 5 लाखाहून जास्त चार्ज करतो. एका आठवड्यात तो 2 ते 3 व्हिडीओ आपल्या चाहत्यांसाठी बनवतो. त्यातून त्याला वार्षिक 10 करोड रुपये मिळतात. याशिवाय 2023 नुसार त्याची एकूण संपत्ती 4 मिलियन डॉलर्स इतकी आहे. भारतीय चलनानुसार 33 कोटींहून अधिक रकमेचा तो मालक आहे.

अमित भदाना (Amit Bhadana)

Amit Bhadana
www.iwmbuzz.com

श्रीमंत यूट्यूबर्सच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर अमित भदानाचे नाव आहे. 2012 मध्ये अमितने कॉमेडी बेसची निवड करून व्हिडीओ बनवायला सुरुवात केली. सध्या त्याचे 24.4 मिलियन सबस्क्राइबर असून 3 मिलियन पर्यंत Viewer पाहायला मिळत आहेत. रिपोर्टनुसार 2019 मध्ये त्याला यूट्यूबकडून 4.5 मिलियन डॉलर्सचे उत्पन्न मिळाले होते. 
caknowledge.com या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार त्याला महिन्याला 30 लाखाहून जास्त रुपये मिळतात. याशिवाय ब्रँड प्रमोशन मधूनही तो पैसे कमावतो. त्याची 2023 नुसार एकूण संपत्ती 6.5 मिलियन डॉलर्स म्हणजेच भारतीय रकमेनुसार 53 करोडहून जास्त आहे.

भुवन बाम (Bhuvan Bam)

Bhuvan Bham
www.mumbaimirror.indiatimes.com

लोकप्रिय आणि श्रीमंत यूट्यूबर्सच्या यादीत तिसऱ्या स्थानावर भुवन बाम याचा नंबर लागतो. भुवनने 2015 मध्ये त्याचा यूट्यूबवरील प्रवास सुरु केला. वेगवेगळ्या फिचर स्टोरी, कॉमेडी व्हिडीओ, सिरीज, गाणी अशा माध्यमातून तो त्याच्या चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. पाच वर्षाच्या अथक मेहनतीनंतर 2021 मध्ये त्याने 16 मिलियन सबस्क्राइबरचा टप्पा यशस्वी रित्या पूर्ण केला. सध्या त्याच्या चॅनेलवर 26 मिलियन सबस्क्राइबर आहेत. तरुणाईमध्ये सध्या त्याच्या व्हिडीओ आणि चॅनेलसंदर्भात प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे.

भुवनला महिन्याला 25 लाखांचे उत्पन्न या माध्यमातून मिळत आहे. याशिवाय इतर ब्रँड प्रमोशन आणि कोलॅबोरेशनमधूनही त्याला पैसे मिळतात. त्याची एकूण संपत्ती 4 मिलियन डॉलर्स इतकी आहे. भारतीय चलनानुसार ही रक्कम 30 करोड रुपयांपर्यंत आहे.

आशिष चंचलानी (Ashish Chanchlani)

Ashish Chanchalani
www.goprofile.in

आशिष चंचलानी हा चौथ्या क्रमांकाचा सर्वात लोकप्रिय आणि श्रीमंत यूट्यूबर आहे. 2014 साली त्याने Ashish Chanchlani Vines या नावाने यूट्यूब चॅनेलची सुरुवात केली. उल्लासनगरमध्ये राहणाऱ्या आशिषने सिंधी फॅमिलीच्या भाव विश्वातील अनेक गोष्टी लोकांसमोर यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून मांडल्या. याशिवाय अनेक कॉमेडी विषयाचे व्हिडीओ तो तयात करतो. सध्या त्याच्या चॅनेलवर 29.5 मिलियन सबस्क्राइबर पाहायला मिळत आहेत.

आशिषचे मासिक उत्पन्न हे 30 लाखाहून अधिक आहे. याशिवाय त्याला ब्रँड प्रमोशन आणि कोलॅबोरेशनमधूनही पैसे मिळतात. त्याची 2023 मध्ये एकूण संपत्ती 5 मिलियन डॉलर्स इतकी आहे. भारतीय चलनानुसार ही रक्कम 39 करोड इतकी आहे.

गौरव चौधरी (Gaurav Chaudhari)

Gaurav Chaudhari
www.forbesindia.com

‘टेक्निकल गुरुजी’ या नावाने आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचा असणारा गौरव चौधरी या यादीत पाचवा क्रमांकावर आहे. ऑक्टोंबर 2015 साली टेक्निकल गुरुजी या नावाने त्याने यूट्यूब प्लॅटफॉर्मची सुरवात केली. या माध्यमातून उत्पादनांचे रिव्ह्यू द्यायला गौरवाने सुरुवात केली, ज्यामुळे लोकांना उत्पादने खरेदी करताना मदत मिळायला लागली. सध्या त्याचे 22.9 मिलियन सबस्क्राइबर पाहायला मिळत आहेत. गौरवची मासिक कमाई 1 कोटीहून जास्त आहे. ज्यामध्ये ब्रँड प्रमोशन देखील समाविष्ट आहे. त्याची 2023 नुसार एकूण संपत्ती 45 मिलियन डॉलर्स इतकी आहे. भारतीय रुपयांमध्ये ही रक्कम 12 करोडहून जास्त आहे. 

बातमीचा सोर्स- ceoreviewmagazine.com