Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

YouTube Monetization च घोडं वॉच टाइमवर अडलय? आता चिंताच सोडा, ‘या’ 4 मार्गानी मिळवा भरपूर पैसे

YouTube Monetization

गेल्या काही वर्षात यू ट्यूब चॅनेल 9 YouTube सुरू कराव आणि त्यातून भरपूर पैसे मिळवावे, या विचाराची लाट आली आहे. असे चॅनेल सुरू केल्यावर कमाईचा पहिला मार्ग खुणावतो तो म्हणजे Google AdSense. पण वॉच टाइम पूर्ण न झाल्याने यातल्या कित्येकांचा हिरमोड होतो. मात्र असले तरी असे 4 मार्ग तुमच्यासमोर आहेत की ज्यामुळे तुम्ही तुमच्या चॅनेलचा प्रभावी वापर करू शकता आणि त्यातून भरपूर पैसेही कमवू शकता.

यू ट्यूब चॅनेल Google AdSense ने मॉनिटाईज करताना 1 हजार subscriber आणि 4 हजार तास वॉच टाइम असा क्रायटेरिया पूर्ण करावा लागतो. यातले सगे सोयरे, मित्र मंडळ अस सगळ करत करत 1 हजार subscriber चा आकडा तर कित्येकांकडून गाठला जातो. पण, घोड अडत ते वॉच टाइमवर! काही वेळा ते कसबस पूर्ण होत देखील. पण Google AdSense साठी apply करताना हे लक्षात येत की, 1 वर्ष तर उलटून गेल आहे. यामुळे आता वर्षाच्या हिशेबात हे 4 हजार तास वॉच टाइम होतच नाही. अखेर पैसे मिळणे दूर पडून यामुळे यू ट्यूब चॅनेल सुरू करून निराशाच वाट्याला येते. मात्र, तुमचे 1 हजार नाही किमान थोडेफार subscriber झाले असतील. थोडे फार व्यूजही  मिळत असतील तर असे 4 मार्ग आहेत ज्यामुळे तुम्ही तुमच्या चॅनेलचा वापर करून या ना त्या प्रकारे पैसे मिळवू शकता. 

1. तुमचे इ प्रॉडक्ट तयार करा आणि ते विका 

काही वेळा ज्याचे यू ट्यूब चॅनेल आहे त्याचे एखादे इ प्रॉडक्ट असते. नसेल तर तुमच्याकडे असणाऱ्या स्किलप्रमाणे तुम्ही असे एखादे ई  प्रॉडक्ट तयार करू शकता. ज्या विषयाची तुम्हाला चांगली माहिती आहे, त्या विषयावर एखादे ई बूक लिहू शकता. एखादा छोटासा व्हिडिओ कोर्स देखील तयार करू शकता. असे प्रॉडक्ट  आपण तयार करू तेव्हा आपल्या व्हीडीओमध्ये मध्येच केव्हातरी जाहिरात करावी. आणि description मध्ये एखाद्या पेमेंट गेट वेची लिंक जोडावी, जेणेकरून तुम्हाला प्रत्यक्ष विक्रीचा व्यवहार करावा न लागता ऑटोमेशन पद्धतीने सगळी प्रक्रिया पार पडेल.  

2. Affiliate Program जॉइन करा 

तुम्ही अगदी vlog चॅनेल सुरू केले असेल तरी Amazon सारखे affiliate program तुम्हाला जॉइन करता येऊ शकतात. यांचा क्रायटेरिया फार मोठा नसतो. थोडेफार व्यूज जरी तुम्हाला मिळत असतील तरी तुम्ही या पद्धतीने कमाई करू शकता. तुम्ही या प्रोग्रामला यशस्वीपणे जॉइन झालात की, तुम्ही वापरत असलेला कॅमेरा, ट्रायपॉड अशा प्रॉडक्टच्या लिंक तुमच्या description मध्ये देऊन शकता. तेच नाही तरी 24 तासात त्या साईटवरुन दुसरे एखादे प्रॉडक्ट जरी यूजर्सने खरेदी केले तरी 5 ते 10 टक्के जे काही त्या प्रॉडक्टसाठी कमिशन ठरले असेल ते तुम्हाला मिळेल.  

3. स्वत:ची सर्व्हिस ऑफर  करा 

तुमच्याकडे एखादे freelancing स्किल असेल तर तुम्ही तुमची सर्व्हिस या ठिकाणी पिच करू शकता. समजा तुम्ही कंटेन्ट रायटिंग, व्हिडिओ एडिटिंग असे काही करु शकत असाल तर तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून तुमची ही सर्व्हिस ऑफर  करून ग्राहक मिळवू शकता. यातूनही तुमची चांगली कमाई होऊ शकते.

4. आपल्या मॉनिटाइज झालेल्या ब्लॉगवर ट्रॅफिक न्या 

कित्येक जण असे करतात  की, जे यू ट्यूब चॅनेल बरोबरच आपल्या ब्लॉगवर सुद्धा काम सुरू करतात. अशा वेळी त्यांचा ब्लॉग मॉनिटाइज झालेला देखील असतो. मग अशा वेळी, यू ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून ब्लॉगकडे ट्रॅफिक नेता येते. तिथे मॉनिटायझेशन ऑप्शन ऑन असल्यामुळे यातून उत्पन्न मिळू शकेल.

असे पर्याय निवडून तुम्ही यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून तुमची कमाई वाढवू शकता.  यातला स्वत:ची सर्व्हिस ऑफर करण्याचा पर्याय असा आहे की, तो जर यशस्वी झाला तर  कदाचित यातून  इतकी कमाई देखील होऊ शकते की, भविष्यात Google AdSense ने चॅनेल मॉनिटाइज झाल तरी ती रक्कम तुम्हाला या तुलनेत छोटी वाटू शकते.