Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

No Salary Increment: मायक्रोसॉफ्टच्या कर्मचाऱ्यांना यंदा पगारवाढ नाही

Microsoft Employees Salary

Image Source : www.zeebiz.com

Microsoft Employees Salary: मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या कर्मचाऱ्यांकरीता एक वाईट बातमी आहे. जागतिक पातळीवर सुरू असलेल्या आर्थिक मंदीमुळे यावर्षी कंपनीने कर्मचाऱ्यांना पगारवाढ न देण्याचा निर्णय घेतला आहे.

Microsoft No Salary Increment This Year: आर्थिक मंदीमुळे निर्माण झालेल्या प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमध्ये मायक्रोसॉफ्टने गेल्या काही महिन्यांत 10,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले आहे आणि आता या आर्थिक वर्षात कंपनी पूर्णवेळ कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारची पगारवाढ देणार नाही. पण कर्मचाऱ्यांना पूर्वीप्रमाणे बोनस, पुरस्कार आणि पदोन्नती देणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

महत्त्वपूर्ण निर्णय घेणे गरजेचे

कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीवर त्यांच्या पुढील योजना अवलंबून असतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांची पगारवाढ होणार की नाही, हे कर्मचाऱ्यांना माहित असणे आवश्यक आहे, असे मायक्रोसॉफ्टचे म्हणणे आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनी त्यांचे कर्मचारी, व्यवसाय आणि भविष्यातील गुंतवणुकीबद्दल नेहमीच सजग असते. कंपनीने सध्या सुरु असलेली आर्थिक परीस्थिती तसेच भविष्यातील योजनांना गती देण्यासाठी, काही निर्णय स्पष्टपणे घेतले आहेत.

सीईओ सत्या नडेला यांचे मत

AI च्या नवीन युगातील वाढती स्पर्धा आणि मॅक्रो इकॉनॉमिकबद्दल असलेली अनिश्चितता या दरम्यान मायक्रोसॉफ्ट काही महत्त्वपूर्ण बदल करत आहे. मायक्रोसॉफ्ट यावर्षी बोनस आणि स्टॉक अवॉर्ड्साठीचे बजेट कायम ठेवणार आहे. पण यावर्षी गेल्या वर्षीपेक्षा जास्त पैसे खर्च करणार नाही, असे मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी स्पष्ट केले आहे.

मंदी आणि सेवेच्या मागणीत घट

मायक्रोसॉफ्टने जानेवारी 2023 मध्ये 10,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली होती. यानंतर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मायक्रोसॉफ्टच्या मालकीच्या प्रोफेशनल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म लिंक्डइनने जवळपास 3.5 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले. तसेच कंपनी ऑगस्ट 2023 पर्यंत आपले चिनी जॉब अॅप्लिकेशन देखील पूर्णपणे थांबविण्याच्या तयारीत आहे. जागतिक मंदी आणि सेवेच्या मागणीत घट यामुळे कंपनीने असा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे.