First Half Sales Of 2023: भारतात प्रत्येक आठवड्यात एक नवीन कार लाँच होत आहे. नवीन लक्झरीयस, एसयुव्ही हायटेक वाहने लाँच केल्यामुळे भारतात लक्झरी कारची मागणी झपाट्याने वाढत आहे. मुख्य म्हणजे ऑडी इंडियाने जानेवारी ते जून 2023 या कालावधीत एकूण 3,474 कार विकल्या आहेत, ज्यात वार्षिक आधारावर 97 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. कंपनी लवकरच Q8 e-tron लाँच करणार आहे.
2023 च्या पहिल्या 6 महिन्यांत, मर्सिडीज-बेंझने भारतात 8,528 मोटारींची विक्री केली आहे, जी गेल्या वर्षीच्या पहिल्या सहामाहीत 7,573 युनिट्स होती. यावर्षी विक्रिमध्ये 12.61% वाढ नोंदवली गेली आहे. त्याच कालावधीत बीएमडब्ल्यूने 5,476 युनिट्सची विक्री केली आहे, जी गेल्या वर्षी 5,191 युनिट्सच्या तुलनेत 5.49% वाढली आहे. त्याच वेळी, ऑडीने 96.83% च्या प्रचंड वाढीसह 3,474 युनिट्सची विक्री केली आहे, जी 2022 च्या पहिल्या सहामाहीत 1,765 युनिट्स होती. या कालावधीत व्होल्वो कारच्या 1,089 युनिट्सची विक्री झाली आहे, जी गेल्या वर्षी 818 युनिट्स होती.
मर्सिडीज बेंझ
मर्सिडीज-बेंझ इंडियाने 2023 च्या पहिल्या 6 महिन्यांत 12.61 टक्के वार्षिक वाढीसह 8,528 कार विकल्या आहेत. त्यातही 1 कोटी किंवा त्याहून अधिक किमतीच्या कंपनीच्या टॉप-एंड कारची मागणी खूप जास्त आहे आणि त्यात 54 टक्के वाढ झाली आहे. कंपनीने सर्वाधिक मर्सिडीज-बेंझ ई-क्लास सेडान आणि जीएलई एसयूव्ही विकल्या आहेत.
बीएमडब्ल्यू इंडिया
बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाने यावर्षी जानेवारी ते जून या कालावधीत 5,867 कार विकल्या आहेत. यामध्ये वार्षिक 5.5 टक्के वाढ झाली आहे. बीएमडब्ल्यू इंडियाच्या मते, कंपनीच्या एकूण विक्रीपैकी SUV विक्रीचा वाटा 50 टक्क्यांहून अधिक आहे. कंपनीचे X1 मॉडेल भारतात सर्वाधिक विकल्या जाते.
ऑडी इंडिया
ऑडी इंडियाने जानेवारी ते जून 2023 या कालावधीत एकूण 3,474 कार विकल्या आहेत, ज्यात वार्षिक आधारावर 97 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. कंपनी लवकरच Q8 e-tron लाँच करणार आहे. त्याच वेळी, व्होल्वो कार इंडियाने 2023 च्या पहिल्या सहामाहीत 1,089 कार वितरित करून 33 वर्ष-दर-वर्ष वाढ नोंदवली. XC60 SUV हे कंपनीचे भारतात सर्वाधिक विकले जाणारे मॉडेल आहे.