Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना दीर्घकालीन दृष्टिकोन फायद्याचा

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना दीर्घकालीन दृष्टिकोन फायद्याचा

शेअर बाजारात निवेश करायचा असेल तर लॉंग टर्मचा विचार करावा

 शेअर बाजारातून पैसा कमावणे सोपे नसले तरी अवघडही नाही. अनेकांना शेअर बाजारातील चढउताराची सतत भिती वाटत असते. त्यामुळे पैसा असूनही शेअर बाजारात उतरण्याची हिमंत काही मंडळी दाखवत नाहीत. याशिवाय संयमाचाही अभाव नसल्याने ही मंडळी बाजारातून दूर राहतात. मात्र बाजाराच्या अनामिक भितीवर मात करुन आपण कुशल गुंतवणूकदार होऊ शकता.

शेअर बाजाराचा एक सदासर्वकालीन नियम आहे, तो म्हणजे गुंतवणुकदारांची जोखीम उचलण्याची क्षमता जेवढी अधिक आहे. त्याप्रमाणात त्याला उच्च परतावा देखील मिळतो. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक हा सर्वोच्च 30 शेअरवर आधारित आहे. या 30 शेअरना ब्लूचिप कंपनी देखील म्हणतात. यातील गुंतवणूक जोखीम कमी करते. परंतु ही गुंतवणूक कमी कालावधीसाठी नसावी.

31 मार्च 1979 पासून भारतात शेअर बाजाराला सुरवात झाली. जर एखाद्या व्यक्तीने कोणताही विचार न करता किंवा अभ्यास करुन टॉप 30 शेअरमध्ये एक लाख रुपये गुंतवणूक केली असती तर आज त्याचे मूल्य सुमारे 300 ते 500 पट झाले असते. याचाच अर्थ आपण एखाद्या शेअरमध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणूक केली तर चांगला परतावा मिळण्याची संधी राहते.

शेअर बाजाराने दीर्घकाळात गुंतवणूकदारांना नेहमीच दणदणीत परतावा दिला आहे. कारण दीर्घकाळातील वाटचाल औद्योगिक विकासावर अवलंबून आहे. कमी कालावधीत बाजार हा भावनांवर आधारलेला असतो. या काळात येणार्‍या बातम्या आणि विविध घटनांमुळे बाजारात चढउतार राहतो.

कमी कालावधीत जोखीम अधिक. जर आपण एक वर्षासाठी गुंतवणूक करत असाल तर जोखीम अधिक राहते. यामध्ये प्रसंगी दहा टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान होण्याचीही भीती असते. याउलट आपण पाच वर्षाचा विचार केल्यास 3 टक्के नुकसान होण्याची शक्यता राहते. जर आपण 15 वर्षापेक्षा अधिक काळासाठी गुंतवणूक करत राहल तर नुकसानीची शक्यता राहतच नाही. कमी कालावधीसाठी आपल्याला एकाचवेळी मोठा लाभ किंवा मोठी हानी होऊ शकते. म्हणजेच बाजार रोलर कोस्टरने चालतो.

अर्थात शेअर्सची निवड करतानाही एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी. ती म्हणजे सदर शेअरचा भाव हा उच्चांकी पातळीवर नाही ना हे पहावे. विशेषतः तुम्ही एक वर्षाच्या कालावधीसाठी जर गुंतवणूक करणार असाल तर ही बाब आवर्जून पहावी. याची माहिती आपल्याला ब्रोकरकडील अ‍ॅपवर किंवा इंटरनेटवर सहजगत्या मिळू शकते. 52 वीक हाय म्हणजे गेल्या वर्षभरातील उच्चांकी पातळी आणि 52 वीक लो म्हणजे वर्षभरातील नीचांकी पातळी. साधारणतः उच्चांकी पातळी गाठल्यानंतर तिथून काही काळ त्या शेअरच्या भावात घसरणीचा सिलसिला सुरू होतो, असे दिसून येते. त्यामुळे गुंतवणूक करताना शक्यतो या पातळीपेक्षा 10 ते 30 टक्के कमी किंमत असल्यास आपल्याला मिळणारा फायदा हा अधिक राहतो.

यासंदर्भातील सर्वांत ताजे उदाहरण म्हणजे 2020 च्या मार्च महिन्यात लॉकडाऊन लागू झाल्यानंतर  ज्यांनी दिग्गज कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी केली ते अक्षरशः मालामाल झाले. याउलट गतवर्षी शेअर बाजार उच्चांकी पातळीवर असताना शॉर्ट टर्म दृष्टिकोन ठेवून ज्यांनी गुंतवणूक केली असेल तर त्यांना काहीशी निराशा पदरी पडली असण्याची शक्यता आहे. कारण 2021च्या उत्तरार्धात बाजारात घसरण झाल्यामुळे अनेक कंपन्यांचे भाव घसरणीला लागले होते. त्यामुळे उच्चांकी पातळीवर पोहोचलेल्या शेअर्सची खरेदी करणे टाळावे; थोडी वाट पहावी.

दीर्घकालीन दृष्टिकोनातून खरेदी करत असाल तर याचा फारसा विचार करण्याची गरज भासत नाही. पण शॉर्ट टर्मसाठी खरेदी करत असाल तर हा प्राथमिक निकष तपासून पाहायलाच हवा.