Sah Polymers IPO: पॉलिमर बॅगची निर्मिती करणारी साह पॉलिमर्स कंपनीचा आयपीओ (Initial Public Offer-IPO) या आठवड्यात शुक्रवारी (दि. 30 डिसेंबर) सबस्क्रिप्शनसाठी ओपन हाणार असून तो 4 जानेवारी 2023 पर्यंत खुला (Sah Polymers IPO Dates) असणार आहे. साह पॉलीमर कंपनीने या आयपीओची प्राईस ब्रॅण्ड 61 ते 65 रुपये (Sah Polymers Price Band) निश्चित केली. तसेच याच्या एका लॉटमध्ये 230 इश्यू (Sah Polymers lot Size) असणार आहेत. कंपनीने आयपीओच्या माध्यमातून 1,02,00,000 नवीन इक्विटी शेअर्स विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहेत. यात कंपनीने ऑफर फॉर सेल हा पर्याय दिलेला नाही. पॉलीमर कंपनीचे प्रमोटर सॅट इंडस्ट्रीज यांच्याकडे कंपनीचा 91.79 टक्के भाग आहे. (Sah Polymers IPO Subscription Details)
उदयपूर येथे मुख्य ऑफिस असलेल्या कंपनीने (Polymer Manufacturer Sah Polymers) प्रामुख्याने पॉली पॉपलिन (Poly Poplin), उच्च घनतेच्या पॉलीथिन बॅग, FIBC च्या पिशव्या, विणलेल्या सॅक, आणि विणलेल्या उत्पादनांची विक्री करते. कंपनीची भारतात 6 राज्यात आणि एका केंद्रशासित प्रदेशात तसेच आफ्रिका, मध्य पूर्व, युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि कॅरिबियन सारख्या 6 देशांमध्ये उपलब्ध आहे.
Table of contents [Show]
किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 10% हिस्सा | Sah Polymers IPO Subscription
साह पॉलिमर्स कंपनीच्या आयपीओ (IPO) मधील 75 टक्के हिस्सा पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी (QIB) राखीव आहे. गैर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी 15 टक्के हिस्सा राखीव आहे. तर रिटेल म्हणजे किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 10 टक्के हिस्सा राखीव आहे. या आयपीच्या इश्यूचे दर्शनी मूल्य 10 रुपये आहे.
ग्रे मार्केट प्रीमियमची स्थिती काय आहे? | Sah Polymers GMP
बाजारातील तज्ज्ञांच्या मते, साह पॉलिमर्सचा ग्रे मार्केट प्रीमियम सुमारे 6 रुपये आहे. या IPO बाबत किरकोळ गुंतवणूकदारांमध्ये संमिश्र उत्सुकता आहे. अनेक ब्रोकर्सनी या IPO मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. कंपनीचे शेअर्स 12 जानेवारी 2023 रोजी BSE आणि NSE वर लिस्ट केले जाऊ शकतात.
आयपीओतून मिळणाऱ्या निधीचा वापर | Company Future Plan
आयपीओच्या माध्यमातून मिळणाऱ्या निधीतून कंपनी नवीन प्रोडक्टस तयार करण्यासाठी फॅसिलिटी उभारणार आह. तसेच कंपनी प्राधान्याने घेतलेल्या कर्जाची परतफेड करणार आहे. त्याचबरोबर कंपनीला सध्या आवश्यक असलेलेल्या भांडवलाची गरज सुद्धा पूर्ण करणार आहे. या आयपीसाठी मर्चंट बँकर म्हणून Pantomath Capital Advisors ही कंपनी काम पाहणार आहे. तर Link Intime India Private Limited ही कंपनी IPO ची रजिस्ट्रार आहे.
साह पॉलिमर आयपीओची संपूर्ण माहिती | Sah Polymers IPO Details
IPOदिनांक | 30 डिसेंबर 2022 ते 4 जानेवारी 2023 |
Face Value (फेस व्हॅल्यू) | 10 रुपये प्रति शेअर |
आयपीओची बॅण्ड प्राईस | 61 रुपये ते 65 रुपये प्रति इश्यू |
लॉट साईज | 230 इश्यू |
इशू साईझ | 10,200,000 इक्विटी शेअर्स (एकूण 66.30 कोटीरुपये) |
फ्रेश इशू | 10,200,000 इश्यू |
इशू टाईप | Book Built Issue IPO |
एक्सचेंज | BSE, NSE |
QIB शेअर्स ऑफर | इशूच्या 75% कमी नाही. |
NII (HNI) शेअर्स ऑफर्स | इशूच्या 15% कमी नाही. |
रिटेल शेअर्स ऑफर्स | इशूच्या 10% कमी नाही. |
कंपनी प्रोमोटर | सॅट इंडस्ट्रीज लिमिटेड |