जगप्रसिध्द इलेक्ट्रिक कार निर्माती कंपनी टेस्ला (Tesla Inc) येत्या काळात भारताकडून मोठ्या प्रमाणात ऑटोमोबाइल पार्ट्स खरेदी करणार आहे. वाणिज्य मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा टेस्लाची भारतातील ऑटोमोबाइल पार्ट्सची आयात 1.7 ते 1.9 अब्ज डॉलर किमतीची असेल. एकीकडे टेस्ला भारतात गुंतवणूक करण्यास तयार आहे, मात्र भारताने इलेक्ट्रिक वाहनांवरील 100% आयात शुल्क कमी करावे अशी टेस्लाचे सर्वेसर्वा एलन मस्क (Elon Musk) यांची मागणी आहे.
मात्र भारत सरकार 'मेड इन इंडिया'ला प्राधान्य देत असून परदेशी बनावटीच्या इलेक्ट्रिक वाहनांवर असलेले आयात शुल्क कमी करण्याची त्यांची कुठलीही योजना नाहीये. मात्र भारतातील एकूण ग्राहकवर्ग बघता,त्यांची खरेदी क्षमता बघता टेस्ला मात्र भारताच्या ऑटोमोबाइल बाजारपेठेत उतरण्याचे स्वप्न बघत आहे.
भारताचे ऑटोमोबाइल मार्केट जोरात
गेल्या काही वर्षांपासून भारताचे ऑटोमोबाइल मार्केट (Automobile Market) वेगाने कामगिरी करत आहे. भारताचे ऑटोमोबाइल सेक्टर जगातील तिसऱ्या क्रमांकांची बाजारपेठ म्हणून उदयास आली आहे. देशांतर्गत उच्च गुणवत्तेचे ऑटोमोबाइल पार्ट्स उत्पादित होत असून, देशोविदेशातील कंपन्या या ऑटोमोबाइल पार्ट्सची आयात करताना दिसत आहे. याचा फायदा थेट भारतीय व्यापाऱ्यांना आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर होताना दिसतो आहे.
Indian stocks linked to electric vehicles may gain after the government said global EV bellwether Tesla Inc. is planning to source as much as $1.9 billion of auto components from the nation this year. pic.twitter.com/1cIpKYBL94
— D.A. Market Online Trading (@itradeph) September 14, 2023
मागील आर्थिक वर्षात टेस्लाने भारतातून 1 अरब डॉलर किमतीचे ऑटोमोबाइल पार्ट्स खरेदी केले होते. यंदाच्या आर्थिक वर्षात टेस्ला मागील वर्षीच्या तुलनेत दुप्पट खरेदी करण्याच्या तयारीत आहे असे वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी म्हटले आहे.
इलेक्ट्रिक वाहने असतील भविष्य
द ऑटोमोटिव्ह कंपोनेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या (ACMA) वार्षिक बैठकीत बोलताना वाणिज्य मंत्र्यांनी ही माहिती दिली. ऑटोमोबाइल पार्ट्स बनवणारे देशभरातील उद्योजक अ बैठकीत सामील झाले होते.
येणाऱ्या काळात इलेक्ट्रिक वाहनेच (Indian Electric Vehicle) भविष्य ठरणार असून, त्यांच्या निर्मितीत आणि खरेदीत मोठी वाढ होताना दिसणार आहे असेही मंत्री गोयल म्हणाले.