Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Life Insurance: चाळिशीमध्ये टर्म इन्शुरन्स घेताना 'या' गोष्टींचा विचार करा?

Term insurance

वयाच्या चाळिशीमध्ये अंगावर जास्त जबाबदाऱ्या असतात. जसे की, पत्नी, मुले, वयोवृद्ध आईवडील यांची जबाबदारी तुमच्यावर असेल. तसेच विविध प्रकारचे कर्जही असू शकतात. अशी परिस्थितीत जर अकाली निधन झालं तर आर्थिक अडचणी येतात. वयाच्या या टप्प्यातही तुम्ही कुटुंबाला भविष्यातील अडचणींपासून सुरक्षित करू शकता.

Term insurance at 40 age: जीवन विमा ही प्रत्येकाची प्राथमिक गरज बनली आहे. कोरोनाने हे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. घरातील कर्त्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागल्याची अनेक उदाहरणे आपल्या समोर आहेत. जर अद्यापही तुम्ही जीवन विमा घेतला नसेल तर पॉलिसी खरेदी करू शकता. जीवन विमा पॉलिसाला टर्म पॉलिसी असेही म्हटले जाते. पॉलिसी पिरियडमध्ये मृत्यू झाल्यास नॉमिनीला मोठी रक्कम मिळते. यातून मुलांचे शिक्षण, कर्ज आणि इतर प्रकारचे खर्च भागवले जाऊ शकतात. तेही तुमच्या अनुपस्थितीत. कोरोनानंतर भारतात टर्म इन्शुरन्सबाबत जगजागृती वाढली आहे.

वयाच्या चाळीशीमध्ये अंगावर जास्त जबाबदाऱ्या असतात. जसे की, पत्नी, मुले, वयोवृद्ध आईवडील यांची जबाबदारी तुमच्यावर असेल. तसेच विविध प्रकारचे कर्जही तुमच्यावर असू शकतात. अशी परिस्थितीत जर अकाली निधन झालं तर आर्थिक अडचणी येतात. त्यामुळे तुमच्या आर्थिक गरजा पाहून त्यानुसार कव्हर निवडावा.

भारतामध्ये तरुण वयोगटातील सर्वाधिक लोकसंख्या आहे. भारतामध्ये मिलेनियल्सची (1980 - 90 च्या दशकात जन्म झालेल्यांची) संख्या सुमारे 42 कोटी आहे. एकूण लोकसंख्येच्या ही 34 टक्के आहे. हे 42 कोटी नागरिक देशातील वर्कफोर्सच्या 47 टक्के आहे. या गटातील नागरिक चाळिशीकडे झुकत चालले आहेत. पुढील दहा वर्षात चाळिशीतील लोकसंख्येत मोठी वाढ होणार आहे. त्यामुळे आर्थिक गरजा ओळखून जीवन विमा लवकरात लवकर काढून कुटुंबियांना सुरक्षित करा.

किती प्रिमियम भरावा लागेल? (Term Insurance premium in 40s)

वाढत्या वयानुसार जीवन विमा काढताना जास्त प्रिमियम भरावा लागतो. त्यामुळे कधीही कमी वयात टर्म प्लॅन घेणे फायदेशीर ठरते. मात्र, जर तुम्ही 40 मध्ये टर्म प्लॅन काढत असाल तर शारीरिक व्याधी, आजार याबाबतची माहिती अजिबात लपवू नका. जर भविष्यात क्लेम करण्याची गरज पडली तर दावा नाकारला जाण्याची शक्यता असते. या वयात टर्म प्लॅन घेताना प्रिमियम थोडा जास्त भरायची तयारी ठेवा. 

अतिरिक्त रायडर्स - (Extra riders in Term plan)

वाढत्या वयानुसार शारीरिक व्याधी जडण्याची शक्यता असते. त्यामुळे क्रिटिकल इलनेस रायडर घेणे फायद्याचे ठरू शकते. उतार वयात जर गंभीर व्याधी जडली तर उपचारासाठी पैशांची मदत होईल. आरोग्य विम्याचे प्रिमियम कायम वाढत असतात. मात्र, टर्म प्लॅनमध्ये जर तुम्ही क्रिटिकल इलनेस रायडर घेत असाल तर तुम्हाला दरवर्षी जास्त प्रिमियम द्यावा लागणार नाही, आणि अनेक गंभीर आजारांपासून तुम्हाला सुरक्षा मिळेल. 

शारीरिक तंदुरूस्ती (Physical fitness)

टर्म प्लॅन खरेदी करताना विमा कंपनीकडून हेल्थ चेकअप केले जाते. आरोग्य चाचणीमध्ये जर काही व्याधीची लक्षणे आढळून आली तर कंपनी विमा कवच देण्यास नकार देऊ शकते. किंवा तुम्हाला जास्त प्रिमियम भरावा लागेल. त्यामुळे फिजिकल फिटनेसकडे लक्ष दिले पाहिजे. अतिरिक्त मद्यसेवन, गुटखा आणि सिगारेटच्या व्यसनापासून दूर राहा. विमा कंपनीला आरोग्याबाबतची माहिती देताना खोटे बोलू नका.

अनेक जण कमी वय दाखवून प्रिमियम कमी करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, खोटी माहिती दिल्यास विम्याचा दावा नाकारला जातो. त्यामुळे चुकीची किंवा खोटी माहिती न देता विमा कंपनीला अचूक माहिती द्या. चाळिशीत असतानाही तुम्ही तुमच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवू शकता.