Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

TRAI : मोबाईल कंपन्यांचे एसएमएस, कॉलिंगमधून उत्पन्न घटले; तर इंटरनेट डेटामुळे 10 पटीने वाढले

TRAI : मोबाईल कंपन्यांचे एसएमएस, कॉलिंगमधून उत्पन्न घटले; तर इंटरनेट डेटामुळे 10 पटीने वाढले

गेल्या 10 वर्षात मोबाईल कंपन्यांना फोन कॉल्सच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नात 94 टक्के आणि एसएमएसच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नात 80 टक्क्यांनी घट झाली आहे. या ऐवजी आता मोबाईल कंपन्यांना इंटरनेट डेटाच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नात 10 पटीने वाढ झाली असल्याचे ट्रायच्या अहवालात (TRAI Report) म्हटले आहे.

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) ने भारतातील मोबाईल नेटवर्क कंपन्यांच्या उत्पन्नाबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये  मोबाईल कंपन्यांना एसएमएस आणि मोबाईल कॉलमधून मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. गेल्या 10 वर्षात मोबाईल कंपन्यांना फोन कॉल्सच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नात 94 टक्के आणि एसएमएसच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नात 80 टक्क्यांनी घट झाली आहे. या ऐवजी आता मोबाईल कंपन्यांना इंटरनेट डेटाच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नात 10 पटीने वाढ झाली असल्याचे ट्रायच्या अहवालात (TRAI Report) म्हटले आहे.

इंटरनेट डेटाचा वापर वाढला

TRAI ने आपल्या अहवालामध्ये व्हॉट्सअ‍ॅप, गुगल मीट, यासह इतर सोशल मीडिया अॅपच्या माध्यमातून इंटरनेट कॉल्स आणि मेसेजिंगचा वापर झपाट्याने वाढला आहे. टेलिकॉम नेटवर्कद्वारे कॉल आणि मेसेज करण्याऐवजी लोक आता इंटरनेट कॉलिंग आणि मेसेजिंगचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. त्यामुळे इंटरनेट डेटा हा जगभरातील टेलिकॉम कंपन्यांसाठी उत्पन्नाचा एक प्रमुख स्त्रोत बनला आहे. भारतातही जून 2013 ते डिसेंबर 2022 पर्यंत टेलिकॉम कंपन्यांचे उत्पन्न अशाच पद्धतीने बदलत गेले आहे. या 10 वर्षात SMS आणि Calling ऐवजी इंटरनेट डेटाच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ झाली आहे.

10 वर्षात कमाईचे आकडे बदलले-

दूरसंचार कंपनीचे उत्पन्न हे प्रति युजरच्या माध्यमातून सरासरीच्या उत्पन्न स्वरुपात ग्राह्य (ARPU) धरले जाते. त्यानुसार एसएमएस आणि कॉलिंगच्या माध्यमातून 10 वर्षापूर्वी एकूण ARPU हा 123.77 रुपये होता. आता तो 41 टक्क्यांनी वाढून 146.96 रुपये झाला आहे. तर 10 वर्षांपूर्वी इंटरनेट डेटामधून 8.1 टक्क्यांचा महसूल मिळत होता. आज तो 85.1 टक्के मिळत आहे. म्हणजेच आज टेलिकॉम कंपन्यांच्या उत्पन्नात इंटरनेटमधून 10 पट अधिक  वाढ झाली आहे. यामध्ये  सरासरी प्रत्येक ग्राहकाला प्रति नेटवर्क कॉल 72.93 रुपये मिळत होते. तेच आजच्या घडीला केवळ 14.79 रुपयांवर उत्पन्न आले आहे. तसेच SMSची ही कमाई 3.99 रुपये होती. ती आता केवळ सरासरी 23 पैशांवर आली आहे.