TDS Payable Post Office Schemes : पोस्ट ऑफिसमध्ये अनेक दिर्घकालीन आणि अल्पकालीन गुंतवणूक योजनांचे पर्याय आहेत. यामध्ये अनेक योजना अशा आहेत, ज्यामध्ये गुंतवणूक केल्यास कर सूट मिळते. परंतु पोस्ट ऑफिसच्या सर्व योजना करमुक्त नाहीत. पोस्ट ऑफिसच्या अनेक योजनांवर मिळणाऱ्या व्याजावरही कर आकारला जातो. आयकर कायदा, 1961 च्या कलम 80C अंतर्गत या योजनांमध्ये कोणतीही कर सूट दिली जात नाही.
Table of contents [Show]
TDS म्हणजे काय?
'टॅक्स डिडक्टेड अॅट सोर्स' याला TDS म्हणतात. म्हणजेच एखाद्या व्यक्तीच्या उत्पन्नाच्या स्रोतातून थेट कर भरण्याची तरतूद करण्यात आली आहे. करचोरी कमी करण्याच्या आणि महसूल वाढवण्याच्या उद्देशाने सरकारने याची सुरुवात केली आहे.
टीडीएस कपात हा फक्त पगार किंवा भत्त्यावरच होते असे नाही. टीडीएस कपातीस पात्र असणार्या अनेक सेवा आहेत. मुदत ठेवीवरील व्याज, लाभांश, शेअरपासून मिळणारे उत्पन्न, लॉटरीत जिंकलेली रक्कम, कंत्राटदाराने भरलेले बिल, विमा विकल्यानंतर कमिशनपोटी मिळणारी रक्कम, ब्रोकरेज कमिशन, अचल मालमत्तेचे हस्तांतर करणे, भाड्याचा भरणा, बँकेतून मिळणारे व्याज, कोणत्याही कंपनीच्या संचालकाला मिळणारा लाभ यावरही टीडीएस आकारला जातो. आज आपण पोस्ट ऑफिसच्या अशा योजनांबद्दल जाणून घेऊया, ज्यामध्ये TDS कापला जातो आणि TDS कापला जात नाही.
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र अंतर्गत TDS हा वार्षिक 50,000 रुपयांपेक्षा जास्त व्याजावर कापला जातो. ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि सामान्य नागरिकांसाठी 40,000 रुपयांपेक्षा जास्त व्याजाच्या रकमेवर कर कपात केली जाईल.
इंडिया पोस्ट टाइम डिपॉझिट योजना
आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत, 5 वर्षांच्या मुदतीच्या ठेवी अंतर्गत जमा केलेल्या रकमेवर (1.5 लाखांपर्यंत) आधीच कर कपात केली जाईल. एक वर्षाच्या, दोन वर्षांच्या किंवा तीन वर्षांच्या ठेवी जमा खात्यांवर कर कपात केली जात नाही. 'इंडिया पोस्ट टाइम डिपॉझिट योजना' या योजनेद्वारे मिळणाऱ्या व्याजावर कर लागू होतो. तुमचे टॅक्स रिटर्न भरताना,तुम्हाला 'इतर स्त्रोतांकडून मिळणारे उत्पन्न' या ऑपशन अंतर्गत व्याजाचे उत्पन्न समाविष्ट करावे लागते आणि योग्य आयकर भरावा लागतो.
ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS)
ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) अंतर्गत ठेवींवर कलम 80C अंतर्गत कर लाभ उपलब्ध आहेत. परंतु, ५०,००० रुपयांपेक्षा जास्त व्याजावर टीडीएस कापला जातो.
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना खाते (MIS)
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना खाते (MIS) या योजनेत मिळणाऱ्या व्याजावर कर भरावा लागतो. ठेवींसाठी कलम 80C अंतर्गत कोणतीही वजावट (No Deduction) नाही. ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत 40,000 आणि 50,000 रुपयांपेक्षा जास्त व्याजावर या योजनेत TDS कापला जातो.
इंडिया पोस्ट रिकरिंग डिपॉझिट
इंडिया पोस्ट रिकरिंग डिपॉझिट या योजनेत तुम्हाला मिळणारे व्याज उत्पन्न ४० हजार रुपयांपेक्षा जास्त असल्यास बँक आणि पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिटवर मिळणारे व्याज स्त्रोतातून वजा केले जाईल. ज्येष्ठ नागरिकांसाठी करपात्र व्याजाची रक्कम 50,000 रुपये आहे.