Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Independence Day Deals : ही संधी सोडू नका..! 76 रुपयात खरेदी करा TCL चा दमदार टीव्ही; साउंडबारही मोफत मिळणार

Independence Day

Image Source : www.tcl.com

इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे आणि टीव्ही निर्मिती उद्योगातील एक प्रमुख ब्रँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या TCL या कंपनीकडून भारताच्या 76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त खास ऑफर्स आणल्या आहेत. यानुसार स्मार्ट टीव्ही खरेदीसाठी इच्छुक असणाऱ्या ग्राहकांसाठी एक धमाकेदार ऑफर आहे. ती म्हणजे TCL च्या 4K, QLED, मिनी LED टीव्हीच्या मॉडेलवर साउंडबार मोफत दिला जाणार आहे.

भारताचा 76 वा स्वातंत्र्य दिन (Independence Day) साजरा करण्यासाठी संपूर्ण देश सज्ज झाला आहे. या राष्ट्रीय उत्सवाच्या मुहूर्तावर बाजारात वेगवेगळ्या ऑफर्स आणि सेलचा धमाका सुरू झाला आहे. त्याच प्रमाणे TCL या इलेक्ट्रॉनिक उपकरणे बनवणाऱ्या कंपनीने देखील खास स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर 'सेलिब्रेट ग्रेटनेस' (Celebrate Greatness) विशेष ऑफर आणली आहे. ज्यामुळे कित्येक भारतीयांचा स्वातंत्र्यदिन आणखी उत्सहात साजरा होऊ शकणार आहे. TCL या कंपनीकडून टीव्ही खरेदीदारांसाठी धमाकेदार ऑफर जाहीर केल्या आहेत.

टीव्ही खरेदीवर मोफत साऊंडबार-

इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे आणि टीव्ही निर्मिती उद्योगातील एक प्रमुख ब्रँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या TCL या कंपनीकडून भारताच्या 76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त खास ऑफर्स आणल्या आहेत. यानुसार स्मार्ट टीव्ही खरेदीसाठी इच्छुक असणाऱ्या ग्राहकांसाठी एक धमाकेदार ऑफर आहे. ती म्हणजे  TCL च्या  4K, QLED,  मिनी LED टीव्हीच्या मॉडेलवर साउंडबार मोफत दिला जाणार आहे.

32,990 रुपयांपासून स्मार्ट टीव्ही

स्वातंत्र्य दिनाच्या या उत्सोवानिमित्त तुम्ही TCL चे विविध मॉडेल्सचे टीव्ही खरेदी करत असाल तर तुम्हाला तर तुम्हाला निवडक मॉडेल्सवर 7990 रुपये आणि 10,990 रुपये किमतीचे साउंडबार मोफत मिळवता येणार आहेत. TCL कंपनीच्या 4K QLED स्मार्ट प्रीमियम टीव्हीच्या किमती 32,990 रुपयांपासून 2,19,990 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. TCL च्या टीव्ही एक उत्कृष्ट दर्जाच्या आणि स्मार्ट वैशिष्ट्यापूर्ण सुविधांसह सुसज्ज आहेत.

फक्त 76 रुपये डाऊन पेमेंट 

या स्वातंत्र्य दिन महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर TCL कडून ग्राहकांसाठी आणखी एक धमाकेदार ऑफर देण्यात आली आहे. ती म्हणजे तुम्हाला फक्त 76 रुपये डाऊनपेमेंट भरून टीव्ही खरेदी करता येणार आहे. TCL च्या काही निवडक टीव्ही खरेदी करण्यासाठी ग्राहकांना 76 रुपये डाऊन पेमेंट भरून खरेदी करता येणार आहेत. तसेच ग्राहकांना उर्वरीत रक्कमेसाठी 8, 10 किंवा 15 महिन्यांचे सुलभ EMI उपलब्ध करून दिले जाणार आहेत. मात्र, या आकर्षक ऑफर ICICI, SBI, HDFC आणि Axis Bank या निवडक क्रेडिट आणि डेबिट कार्डवरच उपलब्ध असणार असल्याची माहिती TCL इंडियाचे सीईओ फिलिप झिया यांनी दिली.