नवीन आर्थिक वर्ष सुरु झाले. वर्षाच्या सुरुवातीलाच गुंतवणुकीचे नियोजन केले तर कर बचत चांगल्या प्रकारे होऊ शकते. अनिवासी भारतीयांना (NRI) भारतातून विविध मार्गाने कमावल्या जाणाऱ्या उत्पन्नावर कर द्यावा लागतो. त्यांना इथल्या कर प्रणालीनुसार आयकर विवरण सादर करावे लागते.
स्थावर मालत्तेतून मिळणारे उत्पन्न, बँकांमधील बचत खात्यावरचे व्याज आणि मुदत ठेवींवर मिळणारे व्याजाचे उत्पन्न, मालमत्ता हस्तांतर किंवा विक्रीवरील भांडवली नफा अशा स्त्रोतांमधून मिळणारे उत्पन्न करपात्र आहे. शेअर्स, टर्म डिपॉझिट, म्युच्युअल फंड्स या गुंतवणुकीवरील उत्पन्नावर भांडवली नफा कर आकारता जातो.
ज्या प्रकारे अनिवासी भारतीय करदात्यांना कर भरावा लागतो. तसेच त्यांना कर वाचवण्याचे देखील पर्याय उपलब्ध आहेत. काही गुंतणुकीवर अनिवासी भारतीयांन कर वजावट किंवा कर सवलत देखील दिली जाते. यात FCNR/NRE खात्यातील गुंतवणुकीवर मिळणारे व्याज, विशिष्ट बॉंड्स आणि सरकारी बचत पत्रांवरील उत्पन्न, भारतीय कंपन्यांकडून मिळणारा लाभांश, इक्विटी गुंतवणुकीतून मिळणारा दिर्घकालीन नफ्यावर कर लागू होत नाही.
अनिवासी भारतीयांना आयकर सेक्शन 54, सेक्शन 54 ईसी, सेक्शन 54 एफनुसार दिर्घकालीन नफ्यावर कर सवलत मिळवू शकतात. आयकर सेक्शन 54 हा स्थावर मालमत्तेच्या विक्रीतून मिळवणाऱ्या दिर्घकालीन नफ्यावर कर सवलत देतो. आयकर सेक्शन 54 एफ हा घराव्यक्तिरिक्त विक्री होणाऱ्या मालमत्तेवरील नफावर कर सवलत मिळते.भांडवली नफ्यावर जिथे टीडीएस कापला आहे तो 'एनआरआय'ला रिटर्न फायलिंग करताना क्लेम करता येतो.
आयकर सेक्शन 80 TTA नुसार अनिवासी भारतीयांना बचत खात्यातील व्याजावर 10000 रुपयांची कर वजावट मिळेल. बँक खाते, पोस्ट ऑफिस आणि को ऑपरेटिव्ह बँकेच्या खात्यांमधील व्याजासाठी ही वजावट लागू असते.
सेक्शन 80 C मधीन ‘एनआरआय’ला मिळणारी कर वजावट
आयकर सेक्शन 80 C मधून भारतीय करदात्यांप्रमाणेच अनिवासी भारतीयांना देखील 1.5 लाख रुपयांच्या कर वजावटींचा लाभ मिळतो.यात आयुर्विमा पॉलिसीच्या प्रिमीयमची रक्कम, पत्नी किंवा मुलांच्या नावे काढलेल्या पॉलिसीसाठी खर्च केलेली रक्कम कर वजावटीस पात्र ठरते. यात प्रिमीयमची रक्कम सम अॅश्युअर्डच्या 10% पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
मुलांच्या ट्युशन फीची रक्कम आयकर सेक्शन 80 C नुसार कर वजावटीसाठी पात्र आहे. अनिवासी भारतीयांना दोन मुलांच्या भारतातील शिक्षणासाठी खर्च केलेली रक्कम या सेक्शनमध्ये कर वजावटीचा लाभ मिळवून देईल.
घर खरेदीसाठी घेतलेल्या गृह कर्जावर मुद्दलाची रक्कम अनिवासी भारतीयाचा कर वाचवण्यास फायदेशीर ठरू शकते. याशिवाय यूलीप आणि इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीममधील गुंतवणुकीवर आयकर सेक्शन 80C मध्ये कर वजावट मिळते.