Tax Saving Ideas : कर वाचवण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये सर्वात आधी FD, NPS, PPF, Policy हे ऑपशन्स येतात. तुम्ही यापैकी कोणत्याही योजनेत 31 मार्चपर्यंत गुंतवणूक करून कर वाचवू शकता. या योजनांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही केवळ कर वाचवू शकत नाही, तर त्यामध्ये चांगला परतावा देखील मिळवू शकता. रेपो दरात वाढ केल्यामुळे सर्व बँकांनी मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ करून ग्राहकांना एक प्रकारे धीर दिला आहे.
Table of contents [Show]
एफडी (Provident Fund)
मुदत ठेव एफडी (FD) मध्ये केलेल्या गुंतवणुकीचा लॉक-इन (Maturity period) कालावधी 5 वर्षांचा असतो. एफडी मध्ये गुंतवणूक करून, तुम्ही आयकर कलम 80C अंतर्गत कर सूट मिळवू शकता. म्हणजेच एका आर्थिक वर्षात, गुंतवणूकदाराला 1.50 लाख रुपयांपर्यंत कर सूट मिळते. ज्येष्ठ नागरिकांसाठी FD अधिक चांगली आहे, कारण त्यांना त्याअंतर्गत 8% किंवा त्याहून अधिक व्याज मिळते.
पीपीएफ (Public Provident Fund)
करबचतीसाठी पुढील गुंतवणुकीचा पर्याय म्हणजे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीपीएफ. या योजनेतील परताव्याची हमी सरकार स्वतः देते. पीपीएफवरील व्याजदर आर्थिक वर्षाच्या प्रत्येक तिमाहीपूर्वी निर्धारित केले जातात. सध्या त्यावर वार्षिक आधारावर 7.1 टक्के व्याज मिळत आहे. या योजनेत गुंतवणूक करूनही, 80C अंतर्गत, वार्षिक 1.50 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर कर सवलत मिळते. गुंतवणूकदार 15 वर्षांसाठी यामध्ये गुंतवणूक करू शकतात. तथापि, एका आर्थिक वर्षात PPF मध्ये जास्तीत जास्त 1.50 लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात.
नॅशनल पेन्शन फंड (National Pension Fund)
पुढील गुंतवणुकीच्या पर्यायाबद्दल बोलताना, तुम्ही नॅशनल पेन्शन फंड (नॅशनल पेन्शन सिस्टम- NPS) NPS निवडू शकता. एनपीएस मध्ये गुंतवणूक करून, तुम्ही एका आर्थिक वर्षात 2 लाख रुपयांपर्यंतची कर सवलत मिळवू शकता. आयकराच्या कलम - 80C अंतर्गत 1.50 लाख रुपयांची सूट उपलब्ध आहे, तर NPS च्या टियर 1 खात्यात योगदानावर 80CCD (1B) अंतर्गत 50,000 रुपयांची अतिरिक्त सूट उपलब्ध आहे.
विम्यामध्ये गुंतवणूक (Policy Investment)
तुम्ही जीवन किंवा आरोग्य विमा खरेदी करूनही कर वाचवू शकता. विमा केवळ कठीण काळातच तुमचे संरक्षण करते असे नाही, तर कर वाचवताना तुमचे मेहनतीचे पैसे वाचवण्याचे कामही करते. आयकर कायद्याच्या कलम- 80D अंतर्गत, जर करदात्याने आरोग्य विम्यासाठी प्रीमियम भरला, तर त्याला आर्थिक वर्षात 25 हजार ते एक लाख रुपयांपर्यंत कर सवलत मिळते. याशिवाय, जीवन विमा पॉलिसीमधील कलम 10(10D) अंतर्गत, विमा परिपक्वता किंवा विमा दाव्यावर कर सूट उपलब्ध आहे. येथे लक्षात ठेवा की कर लाभ फक्त लाइफ इन्शुरन्स पॉलिसीवर उपलब्ध आहे जी किमान 2 वर्षे सक्रिय राहते. तुम्ही अॅन्युइटी प्लॅनचा प्रीमियम भरला तरीही तुम्हाला 80C अंतर्गत कर सूट मिळू शकते.