Tata Company Car Sale: मे महिना हा फोर व्हीलर्सची विक्री करणाऱ्या कंपन्यांसाठी प्रचंड नफा मिळवून देणारा महिना ठरला आहे. मे महिन्यात चारचाकी वाहनांच्या विक्रीत प्रचंड वाढ नोंदवली गेली आहे. मे महिन्यात विविध कंपन्यांनी एकूण 3,34,800 चारचाकी प्रवासी वाहने डीलर्सकडे पाठवली आहेत. यामध्ये मारुती सुझुकी, Hyundai आणि क्रेटा, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीच्या SUV मॉडेल, Kia India, टोयोटा किर्लोस्कर आणि टाटा मोटर्सच्या फोर व्हीलर्सचा समावेश आहे. परंतु, आज आपण जाणून घेणार आहोत की, मे महिन्यात विशेषत: टाटा मोटर्सच्या गाड्यांची, कोणत्या मॉडेलची किती विक्री झाली ते.
Table of contents [Show]
नेक्सॉन-ईव्ही पहिल्या स्थानावर कायम
टाटा मोटर्स कंपनीने मे 2023 मध्ये नेक्सॉन-ईव्ही मॉडेलच्या (Nexon) सर्वाधिक 14423 युनिट्सची विक्री केली आहे. एप्रिल 2023 मध्ये कंपनीने एकूण 15002 युनिट्सची विक्री केली होती. म्हणजेच महिन्या-दर-महिन्याच्या आधारावर एकूण वाढीमध्ये 3.86 टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. वर्ष-दर-वर्ष आधारावर, एकूण घट 1.31 % होती.
दुसऱ्या क्रमांकावर पंच
टाटा मोटर्स कंपनीचे पंच (Punch) मॉडेल दुसऱ्या क्रमांकावर आहे. मे 2023 मध्ये,कंपनीने पंचच्या एकूण 11124 युनिट्सची विक्री केली आहे. एप्रिल 2023 शी तुलना केल्यास, कंपनीने एकूण 10934 युनिट्स विकल्या होत्या. महिन्या-दर-महिन्याच्या आधारावर,पंच मॉडेलची एकूण वाढ 1.74 % आहे. मे 2022 मध्ये कंपनीने एकूण 10241 युनिट्सची विक्री केली होती. वर्ष-दर-वर्ष आधारावर एकूण वाढ 8.62 % आहे.
टियागोची क्रेझ तिसऱ्या क्रमांकावर
टाटा मोटर कंपनीचे Tiago-EV मॉडेल (Tiago) तिसऱ्या क्रमांकावर आहे. मे 2023 मध्ये एकूण 8133 युनिट्सची विक्री झाली. तर मे 2022 मध्ये कंपनीने एकूण 4561 युनिट्सची विक्री केली होती. Tiago-EV मॉडेलच्या विक्रीमध्ये वर्ष-दर-वर्ष आधारावर एकूण ७८ टक्क्यांहून अधिक वाढ दिसून आली. तसेच एप्रिल 2023 मध्ये या मॉडेलच्या एकूण 8450 युनिट्सची विक्री झाली. ही वाढ मे 2023 पेक्षा काहीच युनिट्सने जास्त आहे.
ltroz मॉडेलची प्रचंड विक्री
Altroz मॉडेलची (Altroz) मे 2023 मध्ये प्रचंड विक्री झाली आहे. या दरम्यान एकूण 5420 युनिट्सची विक्री झाली आहे. तसेच एप्रिल 2023 मध्ये एकूण 4658 युनिट्सची विक्री झाली. तर मे 2022 मध्ये,कंपनीने Altos च्या एकूण 4913 युनिट्सची विक्री केली होती, याचा अर्थ वर्ष-दर-वर्षाच्या आधारावर ltroz मॉडेलच्या विक्रीत 10 टक्क्यांहून अधिक वाढ दिसून आली आहे.
टाटाच्या हॅरियर मॉडेलची मागणी
टाटा कंपनीच्या हॅरियर मॉडेलने (Harrier) मे 2023 मध्ये एकूण 2303 युनिट्सची विक्री केली. तसेच एप्रिल 2023 मध्ये एकूण 2783 युनिट्सची विक्री झाली. तर मे 2022 मध्ये एकूण 2794 युनिट्सची विक्री झाली आहे. वर्ष-दर-वर्षाच्या आधारावर, एकूण 17 टक्क्यांहून अधिक घट दिसून आली आहे.