Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Electric Bicycle : टाटाची कंपनी स्ट्रायडरने लाँच केली इलेक्ट्रिक सायकल, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Electric Bicycle

Image Source : www.india.postsen.com

Electric Bicycle : आजकाल तरुणांमध्ये इलेक्ट्रिक सायकलची नवीन क्रेझ आहे. टाटाची सायकल उत्पादक कंपनी स्ट्रायडरने आपली नवीन सायकल Zeeta Plus लॉंच केली आहे. या इलेक्ट्रिक सायकलमध्ये 36W/6AH बॅटरी पॅक देण्यात आला आहे.

Electric bicycle : आजकाल तरुणांमध्ये इलेक्ट्रिक सायकलची नवीन क्रेझ आहे. नवनवीन इलेक्ट्रिक वाहनांबद्दल तरुणांमध्ये सतत चर्चा सुरू असते. अशातच टाटाची सायकल उत्पादक कंपनी  स्ट्रायडरने आपली नवीन सायकल Zeeta Plus लॉंच केली आहे. या इलेक्ट्रिक सायकलमध्ये 36W/6AH बॅटरी पॅक देण्यात आला आहे. जाणून घेऊया, या सायकलचे फीचर्स काय आहेत? किंमत किती आहे? 

या इलेक्ट्रिक सायकलचे डिटेल्स 

मिळालेल्या माहितीनुसार, Stryder Zeeta Plus 216 Wh चा पॉवर जनरेट करते. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ते 25 किमी पर्यंत जाते. याशिवाय यामध्ये पेडल्सही देण्यात आले आहेत. ही सायकल 100 किलोपर्यंत वजन सहज वाहून नेऊ शकते. Stryder Zeeta Plus मध्ये कंपनीने खराब रस्त्यांसाठी स्मूथ सस्पेन्शन सिस्टीम दिली आहे. लांब मार्गांसाठी आरामदायक सीटसुद्धा दिली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी यावर दोन वर्षांची वॉरंटी देत ​​आहे. स्ट्रायडर ही टाटाची  कंपनी आहे.

किंमत किती असेल? 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या जबरदस्त सायकलचा रनिंग कॉस्ट फक्त 10 पैसे प्रति किमी असेल. ही इलेक्ट्रिक सायकल 26,995 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत बाजारात उपलब्ध असणार आहे. दैनंदिन कामासाठी ते खूप उपयुक्त असू शकते. सध्या, ही सायकलची प्रास्ताविक किंमत आहे, जी मर्यादित कालावधीसाठी वैध आहे. लवकरच यात 6,000 रुपयांनी वाढ होऊ शकते.

इलेक्ट्रिक सायकलचे फीचर्स 

सायकलच्या पुढील आणि मागील दोन्ही बाजूस डिस्क ब्रेक दिलेले आहेत. स्ट्रायडर झीटा प्लस चार तासांत पूर्णपणे चार्ज होतो. तुम्ही ते स्ट्रायडरच्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी करू शकता. सायकलमध्ये 250 W ची इलेक्ट्रिक मोटर आहे. सायकल स्टीलच्या हार्डटेल फ्रेममध्ये बांधलेली आहे.

कंपनीच्या म्हणण्यानुसार, स्ट्रायडर झेटा प्लस त्याच्या आधीच्या Zeta ई-बाईकपेक्षा मोठ्या बॅटरी पॅकसह बाजारात लॉन्च करण्यात आला आहे. या सायकलमध्ये ऑटो-कट ब्रेक्स उपलब्ध आहेत. स्ट्रायडर झीटा प्लस सायकलच्या हँडलवरच एक डिस्प्ले ठेवण्यात आला आहे. यामध्ये बॅटरी रेंज, वेळ याबाबतची माहिती रिअल टाइमवर उपलब्ध आहे. 5 फूट 4 इंच उंचीचे रायडर्स अगदी सहज सायकल चालवू शकतात.

Source : www.livehindustan.com