सध्या भारतीय बाजारपेठेत अनेक ऑटो कंपन्या सक्रिय आहेत. ज्यामध्ये होंडा (Honda), टोयोटो (Toyota), किआ (Kia), मारुती सुझुकी (Maruti Suzuki) आणि टाटा (Tata Motors) यांचा समावेश करण्यात आला आहे. भारतातील बहुसंख्य लोकांकडे टाटा मोटर्सच्या गाड्या आहेत. सेफ्टी फीचर्स आणि सर्वोत्तम किंमतीसाठी टाटा मोटर्सला ओळखले जाते. टाटा मोटर्सची टाटा अल्ट्रोज (Tata Altroz) ही सर्वात नामांकित कार आहे. याच टाटा अल्ट्रोज मॉडेलचा कंपनीने विस्तार केला आहे.
नुकतेच कंपनीने भारतीय बाजारपेठेत अल्ट्रोज मॉडेलचे दोन नवीन व्हेरियंट लॉन्च केले आहेत. ज्यामध्ये Tata Altroz XM आणि Altroz XM (S) यांचा समावेश करण्यात आला आहे. या व्हेरियंटमध्ये कंपनीने अनेक आधुनिक फीचर्स दिले असून परवडणाऱ्या किंमतीत ही कार सादर केली आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
Tata Altroz XM आणि XM (S) चे फीचर्स जाणून घ्या
Tata Altroz XM आणि XM (S) या दोन्ही व्हेरीयंटमध्ये 1.2 लिटर क्षमतेचे पेट्रोल इंजिन दिले आहे. हे इंजिन 87bhp पॉवर आणि 115Nm टॉर्क जनरेट करते. या दोन्ही कारमध्ये 5 स्पीड मॅन्युअल गिअर दिले आहेत.
Tata Altroz XM आणि XM (S) कारमध्ये कंपनीने स्टिअरिंग माऊंटेड कंट्रोल्स, हाईट अड्जस्टेबल ड्रायव्हर सीट, इलेक्ट्रिकल ॲडजस्टेबल अँड फोल्डेबल ओआरव्हीएम आणि 16 इंचाची चाके दिली आहेत.
Tata Altroz XM (S) कारमध्ये कंपनीने इलेक्ट्रिक सनरूप दिले आहे. याशिवाय कंपनीने ग्राहकांना आपल्या आवडीचे इन्फोटेनमेंट सिस्टीम (infotainment system) निवडण्याचे स्वातंत्र्य दिले आहे.
ही कार मॅन्युअल पेट्रोल प्रकारामध्ये लॉन्च करण्यात आली आहे.या कारमध्ये कंपनीने रिवर्स पार्किंग कॅमेरा (reverse parking camera) आणि क्रूज कंट्रोल (cruise control) यासारखे फीचर्स दिले आहेत.
Tata Altroz XM आणि XM (S) ची किंमत जाणून घ्या
Tata Altroz XM कारची एक्स शोरूम किंमत 6 लाख 89 हजार 900 रुपयांपासून सुरू होते. तर Tata Altroz XM (S) ची एक्स शोरूम किंमत 7 लाख 34 हजार 900 रुपयांपासून सुरू होते.
प्रतिस्पर्धी कोण असेल?
Tata Altroz XM आणि XM (S) या कारची बाजारातील प्रतिस्पर्धी म्हणून मारुती सुझुकी बलेनो (Maruti Suzuki Baleno), ह्युंदाई i20 (Hyundai i20) यांकडे पाहिले जात आहे.
Source: hindi.financialexpress.com