Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tata Altroz CNG: प्रतिक्षा संपली! टाटा अल्ट्रॉझ CNG मॉडेल लाँच; किंमत आणि फिचर्स जाणून घ्या

Tata Altroz CNG

Image Source : www.carwale.com

टाटा कंपनीचे बहुप्रतिक्षित अल्ट्रॉझ CNG मॉडेल बाजारात दाखल झाले आहे. हॅचबॅक श्रेणीतील या गाडीला ग्राहकांची मोठी मागणी आहे. सीएनजी श्रेणीतील गाडी लाँच करण्याची मागणी ग्राहकांकडून होत होती, ती आता टाटा मोटर्सने पूर्ण केली आहे. नव्या सीएनजी मॉडेलची किंमत 7.55 लाखांपासून पुढे सुरू होत आहे. Altroz iCNG चे 6 व्हेरियंट ग्राहकांसाठी उपलब्ध झाले आहेत.

Tata Altroz CNG: टाटा कंपनीचे बहुप्रतिक्षित अल्ट्रॉझ CNG मॉडेल बाजारात दाखल झाले आहे. हॅचबॅक श्रेणीतील या गाडीला मोठी मागणी आहे. मात्र, सीएनजी व्हर्जन लाँच करण्याची मागणी ग्राहकांकडून होत होती, ती आता टाटा मोटर्सने पूर्ण केली आहे. या गाडीला अत्याधुनिक सेफ्टी फिचर्स देण्यात आले आहे.

सीएनजी मॉडेलची किंमत 7.55 लाखांपासून पुढे सुरू होत आहे.  Altroz iCNG सहा व्हेरियंटमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध असेल. (Tata Altroz CNG price) तसेच टॉप मॉडेलची एक्स शोरुम किंमत 10.55 लाख रुपये असेल. या नव्या व्हर्जनमध्ये दोन सिलेंडर असतील. मागील बाजूस लगेज स्पेसच्या खाली दोन सिलेंडर ठेवण्यासाठी जागा आहे. सिलेंडरचे व्हॉल्व आणि पाइप खालच्या बाजूने ठेवण्यात आले आहे त्यामुळे अपघात होण्याची शक्यता कमी होते.

खास फिचर्स कोणती (Tata Altroz CNG Features) 

नव्या सीएनजी मॉडेलमध्ये व्हाइस कंमाडवर आधारित इलेक्ट्रिक सनरुफ देण्यात आला आहे. वायरलेस चार्जर आणि एअर प्युरिफायर देखील गाडीत उपलब्ध असेल. प्रोजेक्टर हेडलॅम्प, LED DRLs, R16 diamond cut अलॉय व्हील्स, अँड्रॉइड फंक्शनसह 8 स्पीकर टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम तसेच अॅपल कारप्ले कनेक्टिव्हिटी सुद्धा नव्या सीएनजी मॉडेलमध्ये देण्यात आली आहे.

इलेक्ट्रिक कारच्या किंमती तुलनेने जास्त असल्याने ग्राहकांचा कल सीएनजी कार खरेदीकडे आहे. पेट्रोल आणि डिझेल कारपेक्षा सीएनजी ग्राहकांच्या खिशाला परवडते. त्यामुळे मागील काही वर्षात सीएनजी मॉडेल्सची मागणी वाढली आहे. ट्विन सिलेंडर टेक्नॉलॉजी आणि अत्याधुनिक फिसर्चमुळे हे नवे मॉडेल ग्राहकांच्या पसंतीस उतरेल, असे टाटा मोटर्सने म्हटले आहे. सीएनजी इंधनाद्वारे गाडी 18.53 किलोमीटर प्रति किलो एवढे अॅव्हरेज देईल, असा दावा कंपनीने केला आहे. 

सेफ्टी फिचर्स (Extra safety features)

कारमध्ये जेव्हा इंधन भरण्यात येत असेल तेव्हा कार बंद होईल यासाठी एक मायक्रो स्वीच सुद्धा देण्यात आले आहे. अति उष्णतेपासून संरक्षण देण्यासाठी "thermal incident protection" फिचर देण्यात आले आहे. त्यानुसार सीएनजीपासून होणारा इंधनाचा पुरवठा तत्काळ बंद होईल आणि सर्व गॅस वातावरणात सोडला जाईल. गाडी चालवताना गॅस सिलेंडर संबंधीत अपघात होण्याची शक्यता या फिचरमुळे कमी होते.