Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

तारक मेहता का उलटा चष्मा या लोकप्रिय मालिकेतील 'या' कलाकारांना मानधन मिळाले नसल्याने, त्यांना मालिका लागली सोडावी

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah

Image Source : http://www.dnaindia.com/

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: 'तारक मेहता का उलटा चष्मा' ही सर्वाधिक लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेची व यातील कलाकारांची चर्चा ही नेहमीच होते. आता मात्र या मालिकेचे कौतुक नाही तर या मालिकेतील निर्मात्यांवर आरोप आहेत की, त्यांनी मालिकेतील कलाकारांचे लाखो रूपयांचे मानधन थकविले आहे.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah News: तारक मेहता का उलटा चष्मा ही मालिका खूपच लोकप्रिय आहे. या मालिकेचा चाहता वर्गदेखील मोठा आहे. सर्वाच वयातील प्रेक्षक ही मालिका पाहणे पसंत करतात. पण या मालिकेचे चाहत्यांसाठी निराशाजनक बातमी आहे. या मालिकेच्या निर्मात्यांनी कलाकारांचे पैसे थकविल्याने प्रेक्षकांचे आवडते कलाकार ही मालिका सोडताना दिसत आहेत.

कोणी केले आरोप (Who made the Accusation)

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या कार्यक्रमातील कलाकार शैलेश लोढा यांनी निर्मात्यांवर पैसे थकविल्याचा आरोप केला आहे. तसेच त्यांनी इतर कलाकारांचेदेखील लाखो रूपयांचे ही मान थकविल्याचे गंभीर आरोप केले आहे. तसेच मी ही मालिका सोडून सहा महिने झाले तरी, माझे वर्षभराचे पैसे निर्मात्यांनी दिले नाही. 

नेहा मेहता व राज अनादकट यांना ही दिले नाही मानधन (This Money was not Given to Neha Mehta and Raj Anadkat)

शैलेश यांच्याव्यतिरिक्त, टप्पूची भूमिका साकारणारा राज अनादकट आणि अंजली मेहताच्या भूमिकेत दिसणारी नेहा मेहता यांनादेखील निर्मात्यांनी अद्याप मानधन दिलेले नाहीत. ही मालिका सोडल्यानंतरही नेहाचे 30-40 लाख रुपये थकले असल्याची चर्चा आहे. तसेच या कारणांमुळे अनेक कलाकार ही मालिका सोडून चालले आहेत.

'तारक मेहता'चे प्रोजेक्ट हेड काय म्हणतात? (Project Head's Reaction to 'Taarak Mehta')

तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेतील कलाकार शैलेश लोढा यांनी केलेल्या आऱोपांवर उत्तर देताना या मालिकेच प्रोजेक्ट हेड सुहेल रामणी म्हणतात की,"शैलेश लोढा यांच्या काही कागदपत्रांवर सह्या घेणे बाकी आहेत. त्या सह्या झाल्यावर त्यांना त्यांचे पेमेंट घेऊन जा, असे अनेक वेळा सांगण्यात आले होते. मात्र ते पैसे घेण्यासाठी आलेच नाहीत. ज्यावेळी तुम्ही एखादी कंपनी किंवा शो सोडता त्यावेळी एक प्रक्रिया असते, ज्याचे पालन करणे आवश्यक असते. कलाकार, असो वा कर्मचारी सर्वानाच ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असते. ही प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय कोणतीच कंपनी तुमची थकबाकी देऊ शकत नाही."