• 24 Sep, 2023 02:03

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Best Car Loan: सणासुदीनिमित्त गाडी घेताय; मग कार लोनवर बेस्ट इंटरेस्ट रेट देणाऱ्या बँका जाणून घ्या

Best Interest Rate for Car Loan

Best Interest Rate for Car Loan: तुम्ही नवीन गाडी घेण्याच्या विचारात आहात आणि त्यासाठी कार लोन देणाऱ्या बँकांची माहिती शोधत आहात. तर आम्ही तुमच्यासाठी वेगवेगळ्या बँकांचे कार लोनसाठी असलेले इंटरेस्ट रेटची माहिती घेऊन आलो आहोत.

Best Interest Rate for Car Loan:  कोणतंही कर्ज घ्यायचं म्हटलं की, त्याचा इंटरेस्ट रेट किती हे आपण चेक करतो. कारण त्यानुसारच आपल्याला ईएमआयमधून त्या कर्जाची परतफेड करायची असते. त्यामुळे ज्या बँकेचा व्याजदर कमी असतो. आपण त्या बँकेतून कर्ज घेण्याला प्राधान्य देतो. पण काहीवेळेस असंही होतं की, आपला क्रेडिट स्कोअर जर चांगला असेल बँका कमी व्याजदराने कर्ज देतात.

क्रेडिट स्कोअरचा तुमच्या कर्जाच्या व्याजावर किंवा कालावधीवर कसा परिणाम होतो. हे समजून घेण्यासाठी आमचा क्रेडिट स्कोअर रेंज, म्हणजे क्रेडिट स्कोअर चांगला की खराब आणि त्यावरून आर्थिक स्थिती कशी दर्शवते, हा लेख वाचा.

तर आज आपण स्पेसिफिक कार लोन आणि वेगवेगळ्या बँकांचे कार लोनसाठीचे इंटरेस्ट रेट काय आहेत, ही माहिती जाणून घेणार आहोत. यामध्ये आपण सप्टेंबर, 2023 मधील वेगवेगळ्या बँका वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्यांसाठी काय व्याजदर आकारते, हे पाहणार आहोत.

bank charts

वरील तत्क्त्यामध्ये दिलेले व्याजदर हे बँकांच्या वेगवेगळ्या वेबसाईटवरून घेण्यात आलेले आहेत. त्यामुळे यात काही प्रमाणात बदल असू शकतात. त्यात तुमचा क्रेडिट स्कोअर जर चांगला असेल तर तुम्हाला या व्याजदरापेक्षा कमी दराने कारसाठी कर्ज मिळू शकते.

भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील आणि खाजगी क्षेत्रातील बँकांचे व्याजदर हे एकतर फिक्सड् किंवा फ्लोटिंग रेटने असतात. फिक्स व्याजदरामध्ये कर्जाचा ईएमआय शेवटच्या हप्त्यापर्यंत बदलत नाही. पण फ्लोटिंग व्याजदरामध्ये आरबीआयने रेपो रेटमध्ये बदल केल्यावर किंवा कर्ज देणाऱ्या बँकांनी व्याजदरात वाढ केल्यावर कर्जाचा इंटरेस्ट रेट बदलतो. त्यामुळे कर्जदारांचा ईएमआय आणि कालावधी दोन्ही वाढते. यासाठी कार लोन घेण्यापूर्वी प्रत्येक बँकांचे व्याजदर आणि त्याचा व्याजाचा प्रकार समजून घेणे आवश्यक आहे.