• 09 Feb, 2023 07:59

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

सुशांत सिंह एका चित्रपटाचे 5 कोटी मानधन घेत होता, मात्र त्याने एका चित्रपटासाठी फक्त 21 रूपये मानधन घेतले होते

Sushant Singh Rajput

Image Source : http://www.firstpost.com/

Sushant Singh Rajput: अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा 21 जानेवारी 2023 रोजी वाढदिवस झाला. त्याच्या या वाढदिवसानिमित्त अभिनेत्री सारा खान व रिया चक्रवर्ती यांनी सोशलमिडीयाव्दारे पोस्टदेखील केल्या होत्या. आज ही सुशांत सिंगच्या आठवणी प्रेक्षकांमध्ये ताज्या आहेत. असा हा दिग्गज कलाकार चित्रपटासाठी 5 ते 6 कोटी मानधन घेतो, मात्र त्याने एका चित्रपटासाठी फक्त 21 रूपये मानधन घेतले होते.

Sushant Singh Rajput: अभिनेता सुशांत सिंहचा नुकताच वाढदिवस झाला. संपूर्ण सोशलमिडीयावर त्याच्या चाहत्यांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आज ही त्याच्या आठवणी प्रेक्षकांमध्ये ताज्या आहेत. असा हा शुन्यातून तयार झालेला अभिनेता बाॅलिवुड चित्रपटांसाठी 5 ते 6 कोटी मानधन घेतो, मात्र त्याने एका चित्रपटासाठी फक्त फक्त 21 रूपये मानधन घेतले होते. त्याच्या या आठवणीबाबत जाणून घेवु.

कोणत्या चित्रपटासाठी घेतले 21 रूपये (21 Taken for which Movie)

राजकुमार हिराणी दिग्दर्शित 'पीके' (Pk) या चित्रपटासाठी सुशांत सिंगने फक्त 21 रूपये मानधन घेतले होते. या चित्रपटात त्याची अगदी 15 मिनिटांची महत्वपूर्ण भूमिका होती. एरवी तो बाॅलिवुड चित्रपटांसाठी पाच ते सात कोटी मानधन घेतो. पण त्याने या चित्रपटासाठी एक रूपयाही मानधन घेतले नाही. पण हिराणी यांच्या आग्रहामुळे त्याने शगुन म्हणून अगदी आनंदान 21 रूपये मानधन घेतले होते. या चित्रपटात आमिर खान (Amir Khan) व अनुष्का शर्मा (Anushka Sharma) मुख्य भूमिकेत झळकले होते. 

सुशांत सिंग राजपूत चित्रपट (Sushant Singh Rajput Movie)

‘पवित्र रिश्ता’ (Pavitra Rishta) मालिकेत सुशांत सिंगने मानवची भूमिका साकारली होती. त्याची ही भूमिका खूप गाजली होती. या मालिकेनंतर त्याने ‘काई पो चे’ या चित्रपटाद्वारे बॉलिवडूमध्ये पदार्पण केले होते. यानंतर त्याने ‘शुद्ध देसी रोमान्स’ या यशराज फिल्म्सच्या चित्रपटातदेखील झळकला होता. ‘एम.एस.धोनी’ चित्रपटाव्दारे त्याला अभिनेता म्हणून खरी ओळख मिळाली होती. तसेच ‘डिटेक्टीव्ह ब्योमकेश बक्षी’ व  ‘छिछोरे’ त्याच्या या चित्रपटांनादेखील प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. यशाच्या उंच शिखरावर असलेल्या या प्रसिध्द अभिनेत्याने 14 जून 2020 रोजी गळफास घेतला आणि जीवन संपवले. यामुळे संपूर्ण देशदेखील हळहळला होता.