स्मॉल फायनान्स बँकांमध्ये सध्या ठेवीदर वाढवण्याची स्पर्धा लागली आहे. सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेने दोन कोटी रुपयांहून कमी रकमेच्या ठेवींवरील व्याजदरात सुधारणा केली आहे. बँकेकडून आता ठेवींवर 8.51% इतका उच्चांकी व्याजदर ऑफर करण्यात येत आहे. (Suryoday Small Finance Bank offer 8.51% Interest On deposit)
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेच्या वेबसाईटनुसार ठेवींवर सात दिवसांपासून 10 वर्ष मुदतीच्या ठेवींवर 4.00% ते 8.51% इतके व्याज दिले जाते. ज्येष्ठ नागरिकांसाठी ठेवींवर 4.50% ते 9.05% इतके व्याज दिले जाते. 7 ते 14 दिवस मुदतींच्या ठेवींवर आता 4.00% व्याजदर झाला आहे. तर 15 ते 45 दिवसांच्या मुदत ठेवींवर 4.25% आणि 46 ते 90 दिवसांच्या मुदत ठेवींवर 4.50% इतके व्याज दिले जात आहे. 91 दिवस ते 6 महिने मुदत ठेवींवर बँकेकडून 5.00% व्याजदर निश्चित करण्यात आला आहे.
बँकेत जे ठेवीदार 6 महिने ते 9 महिने या कालावधीसाठी ठेवी ठेवतील त्यांना 5.50% इतके व्याज मिळणार आहे. 9 महिन्यांहून अधिक मात्र एक वर्षापर्यंत ठेवींवर 6.00% व्याज दिले जाणार आहे. 999 दिवसांच्या ठेवींवर 8.51% व्याजदर देण्यात येणार आहे. 27 दिवस ते 3 वर्ष मुदतीसाठी ठेवींवर 7.25% व्याजदर आहे. 5 वर्ष मुदतीच्या ठेवींवर 5% व्याज कायम आहे.
ज्येष्ठ नागरिकांना ठेवींवर अतिरिक्त 0.50% व्याज दिले जाणार असल्याचे बँकेने म्हटले आहे. 7 ते 14 दिवसांसाठी ज्येष्ठ नागरिकांना 4.50% मिळणार आहे. तसेच 1वर्षांपासून 1 वर्ष 6 महिने मुदत ठेवींवर ज्येष्ठांना 7.50% व्याज दिले जाणार आहे.