आशिया खंडातील काही भागामध्ये डेंगू, मलेरिया आणि इतर गंभीर व्हायरस पसरवणाऱ्या डासांचा किटकनाशकांमुळेही मृत्यू होत नाही. काही किटकनाशकांविरोधात डासांच्या प्रजातीमध्ये उच्च कोटीची प्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या काळात संपूर्ण आशिया खंडामध्ये मच्छरांमुळे पसरणारे आजार वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. डासांना मारण्यासाठी फवारण्यात येणाऱ्या सततच्या किटकनाशकांविरोधील प्रतिकारशक्ती काही डांसामध्ये निर्माण झाल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. विकसनशील आशिया खंडाच्या आरोग्य व्यवस्थेवर येत्या काळात यामुळे संकटही येऊ शकते.
शहरे आणि नागरी वस्तीतील डास मारण्यासाठी प्रशासनाद्वारे किटकनाशकांची फवारणी केली जाते. मात्र, डासांची या या किटकनाशकामधील केमिकल कंटेट विरोधात प्रतिकारक्षमता निर्माण झाली आहे, असे जपानी शास्त्रज्ञ शिंजी कसायी यांनी म्हटले आहे. शास्त्रज्ञांच्या या गटाने आशिया खंडातील विविध देशांमधील डासांचा अभ्यास केला. त्यामध्ये डासांमध्ये अनेक म्युटेशन्स निर्माण झाल्याचे समोर आले आहे. हे डास किटकनाशकांनाही भीक घालत नाहीत, असा दावा त्यांनी केला आहे.
नव्या औषधांची गरज
डास मारण्यासाठी किटकनाशकामध्ये सर्रास वापरल्या जाणाऱ्या permethrin कंटेटमुळे आता डासांना काहीही फरक पडत नाही. त्यामुळे यावर नवे किटकनाशक शोधून काढण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. कंबोडिया देशातील सुमारे 90 टक्के डासांमध्ये किटकनाशकांविरोधात लढण्याची प्रतिकारक्षमता निर्माण झाली आहे. उच्च प्रतिकारक्षमतेमुळे आता डासांच्या प्रजातीमध्ये वाढ होण्याची भीती निर्माण झाली आहे. कंबोडियातील काही डासांमध्ये तर हजार पटीने जास्त प्रतिकारक्षमता निर्माण झाली आहे. याआधी हे प्रमाण फक्त शंभर टक्के एवढे होते.
ज्या किटकनाशकामुळे याआधी 100 टक्के डास मरत होते त्यामुळे आता फक्त 7 टक्के डासच नाहीसे होत आहेत. म्हणजे सुमारे 93 टक्के डासांवर याचा काहीही परिणाम होत नाही. किटकनाशकाचे प्रमाण 10 पटीने वाढवून पाहिले तरी फक्त 30 टक्केच डास मरतील, असे अभ्यासात समोर आले आहे.