लोकांची जीवनशैली (Lifestyle) सुधारण्यासाठी आरोग्य (Health) आणि फिटनेस (Fitness) क्षेत्र वेगानं विकसित होत आहे. 'द बायोहॅकर' प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून निदानापासून ते वैद्यकीय उपचारांपर्यंत सर्व काही सुविधा पुरवतं. उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या सुनील शेट्टी यांनी नुकतंच 'द बायोहॅकर' या हेल्थकेअर व्हेंचरमध्ये गुंतवणूक (Investment) केली आहे. ललित धर्मानी यांनी याची स्थापना केली आहे. या गुंतवणुकीसंदर्भात सुनील शेट्टी (Suniel Shetty) यांनी माहिती दिली आहे. सीएनबीसीनं याविषयीचं वृत्त दिलं आहे.
'आतापर्यंतची अभ्यासपूर्ण गुंतवणूक'
शेट्टी म्हणाले, की मी 'द बायोहॅकर' या उपक्राबद्दल उत्साहित आहे. कारण मला खात्री आहे आतापर्यंतची माझी ही एक अभ्यासपूर्ण गुंतवणूक आहे. लोकांची जीवनशैली सुधारण्यासाठी आरोग्य आणि फिटनेस क्षेत्रात झपाट्यानं विकास आणि बदल होत आहे. 'द बायोहॅकर' प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून निदानापासून ते वैद्यकीय उपचारांपर्यंत सर्व काही पुरवतं.
नवीन तंत्रज्ञानाद्वारे आरोग्य सुविधा
उपक्रमाचे संस्थापक, ललित धर्मानी यांनी सांगितलं, की नवीन तंत्रज्ञानाद्वारे, लोकांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्याचं रक्षण करण्यासाठी त्यांच्या सवयी आणि जीवनशैली बदलण्याचं आमचे ध्येय आहे. हे एखाद्या व्यक्तीच्या आरोग्यावर लक्ष ठेवून, सेल्युलर स्तरावर डेटा विश्लेषण आणि हाय-टेक चाचण्या करून केलं जाणार आहे. आमचे सेंटर्स भारतात इन-हाऊस सुविधांसह स्थापन करण्यात आली आहेत. मानवी आयुष्य दीर्घकाळ असावं या दृष्टीकोनातून विविध टेस्ट केल्या जातात.
सुनील शेट्टी आहेत व्हेंचर कॅपिटलिस्ट
प्रसिद्ध बॉलिवूड स्टार सुनील शेट्टी सध्या व्हेंचर कॅपिटलिस्ट म्हणूनही आपला ठसा उमटवत आहेत. त्यांच्या आरोग्यसेवा उद्योगातल्या गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओमध्ये एफआयटीटीआरचा (FITTR) समावेश आहे. या माध्यमातून 2020मध्ये प्री-सीरीज A फंडिंगमध्ये सिकोइया कॅपिटलकडून निधी उभारला. मेल ग्रुमिंग कंपनी बिअरडोमध्येदेखील त्यांनी गुंतवणूक केली आहे.