Sundar Pichai Meets Dr. S Jaishankar: गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी केंद्रीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांची भेट घेऊन भारतातील डिजिटल परिवर्तन आणि वैश्विक पातळीवरील डिजिटल डेव्हलपमेंट याविषयी चर्चा केली. तसेच सुंदर पिचाई यांनी भारतातील युपीआयच्या वापराबद्दलचे उदाहरण देऊन इतर देशांनी हा कित्ता गिरवायला हरकत नाही, असे सांगून भारतात सध्या सुरू असलेल्या डिजिटल ट्रान्सफॉर्मिंगचे कौतुक केले.
सुंदर पिचाई आणि एस जयशंकर यांच्यादरम्यान झालेल्या भेटीचा फोटो जयशंकर यांनी सोशल मिडियावर शेअर करत दोघांमध्ये भारतातील डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आणि ग्लोबल स्ट्रॅटेजिक डेव्हलपमेंट याविषयी चर्चा केल्याची माहिती दिली. पिचाई यांनी त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत पिचाई यांनी भारताकडे सध्या G20चे अध्यक्षपद आले असून त्याच्यासाठी सर्वतोपरी मदत करू, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
पिचाई हे तब्बल 5 वर्षांनंतर भारत भेटीवर आले आहेत. या भेटीत त्यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमांना बोलताना भारताच्या डिजिटायझेशनवर प्रामुख्याने भाष्य करत भारताने राबविलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. अण्ड्रॉईड सारख्या फ्री अपमुळे भारतासारख्या देशांमध्ये डिजिटल क्रांती झाल्याचे त्यांनी म्हटले. सरकारचा कारभार योग्य पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तंत्रज्ञानाचा मोठा सहभाग होत आहे.
चीनमधून गुगल प्रोडक्शन बंद करण्याच्या तयारीत
न्यूयॉर्क टाईम्समध्ये आलेल्या एका रिपोर्टनुसार, गुगल चीनमध्ये फॉक्सकॉन करत असलेले पिक्सल 7 फोनचे प्रोडक्शन व्हिएतनामला शिफ्ट करण्याचा विचार करत आहे. याबाबत भारत सरकारशी प्राथमिक बोलणी झाल्याचे सांगितले जात आहे. याचाच भाग म्हणून पिचाई भारत भेटीवर आल्याचे सांगितले जाते. जर गुगल आणि भारत सरकार यांच्यातील बोलणी योग्य पद्धतीने झाल्यास अपल आणि सॅमसंगनंतर गुगल ही तिसरी मोठी कंपनी ठरेल. जी भारताला एक्सपोर्ट सेंट्रिक मॅन्युफॅक्चरिंगच्या रूपात पाहत आहे. या तिन्ही कंपन्यांचे उत्पादन भारतामधून झाल्यावर भारत तिसरा मोबाईल डिव्हाईस मेकर ठरेल.