Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Sula Vineyards IPO: भारतातील सर्वांत मोठ्या वाईन कंपनीचा आयपीओ पुढच्या आठवड्यात ओपन होणार!

Sula Vineyards IPO

Sula Vineyards IPO: वाईन बनवणारी भारतातील सर्वांत मोठी वाईन कंपनी सुला विनेयार्ड्स कंपनीचा आयपीओ पुढील आठवड्यात ओपन होण्याची शक्यता आहे. सुला विनयार्ड्स (Sula Vineyards) ही वाईन तयार करणारी कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्टिंग होणारी पहिली कंपनी असेल.

Sula Vineyards IPO: सुला विनेयार्ड्स कंपनीचा आयपीओ पुढील आठवड्यात ओपन होणार असून, कंपनीने या आयपीओची प्रति शेअर किंमत 340-357 रुपये ठरवली असल्याची माहिती सीएनबीसी-टीव्ही 18च्या सूत्रांनी दिली आहे. सुला वाईनचा आयपीओ (Initial Public Offer-IPO) 12 ते 14 डिसेंबर या दरम्यान ओपन होणार आहे. तर मार्केटमधील मोठ्या गुंतवणूकदारांसाठी (Anchor Investor) 9 डिसेंबरला सुरूवात होईल. सुला वाईनचा आयपीओ 950-1000 कोटी रुपयांचा असेल, असे बोलले जाते.

देशातील सर्वांत मोठी वाईन कंपनी सुला विनयार्ड्स (Sula Vineyards) आयपीओद्वारे (Initial Public Offer-IPO) निधी उभारण्याच्या तयारीत आहे. कंपनीने याबाबतची तयारी म्हणून यापूर्वीच सेबीकडे (Securities and Exchange Board of India-SEBI) कागदपत्रे सादर केली होती. सुला विनयार्ड्सचे लिस्टिंग झाले तर शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध होणारी ही पहिली वाईन कंपनी ठरेल. तर अल्कोहोल आणि स्पिरिटची निर्मिती करणारी आणि आयपीओ आणणारी दुसरी कंपनी असेल.

सुला विनयार्ड्स ही कंपनी नाशिकमधील कंपनी असून, ती कंपनीचे सर्व शेअर्स ऑफर फॉर सेल (Offer for Sale) म्हणून आणणार आहे. सुला विनयार्ड्सला बेल्जिअममधील वर्लिनवेस्ट (VerlinWest) कंपनीतून निधी पुरवठा होतो. वेर्लिनवेस्टने 10 वर्षांपूर्वी सुला विनयार्ड्समध्ये गुंतवणूक केली होती. राजीव सामंत हे सुला विनयार्ड्सचे एमडी आणि सीईओ (Rajeev Samant, MD & CEO, Sula Vineyards) आहेत. राजीव सामंत यांनी 1999 मध्ये नाशिकमध्ये पहिल्या वाईनरीची (सुला विनयार्ड्स) स्थापना केली. आज सुला ही भारतातील आघाडीची वाईन कंपनी असून ती जगभरातील वाईन ब्रॅण्डचे नेतृत्व करते.