• 04 Oct, 2022 16:44

IPO Update : ‘सुला वाईन’ आयपीओ आणण्याच्या तयारीत!

IPO INVESTMENT sula wine yard

IPO Update : सुला विनयार्ड्स (Sula Vineyards) ही वाईन तयार करणारी कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्टिंग होणारी पहिली कंपनी असेल. अल्कहोल आणि स्पिरिट या क्षेत्रात काम करणारी आणि आयपीओ आणणारी ही दुसरी कंपनी असेल.

Sula Vineyards IPO : देशातील सर्वांत मोठी वाईन कंपनी सुला विनयार्ड्स आयपीओद्वारे (Initial Public Offer-IPO) निधी उभारण्याच्या तयारीत आहे. कंपनीने याबाबतची तयारी केली असून सेबीकडे (Securities and Exchange Board of India-SEBI) कागदपत्रे सादर केली आहेत. सुला विनयार्ड्सचे लिस्टिंग झाले तर शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध होणारी ही पहिली वाईन कंपनी असेल. तर अल्कोहोल आणि स्पिरिटची निर्मिती करणारी आणि आयपीओची तयारी करणारी दुसरी कंपनी असेल. ऑफिसर्स चॉईस व्हिस्की (Officer’s Choice Whisky) बनवणाऱ्या अलाईड ब्लेंडर्स अ‍ॅण्ड डिस्टिलर्सने (Allied Blenders & Distillers) गेल्या महिन्यात सेबीकडे (SEBI) आयपीओसाठ कागदपत्रे सादर केली आहेत.


सुला विनयार्ड्स ही कंपनी नाशिक (महाराष्ट्र) येथे स्थित आहे. नाशिकमध्ये द्राक्षांची लागवड सर्वाधिक होते. कंपनी पूर्णपणे विक्रीची ऑफर घेऊन येणार आहे. तसेच हिला बेल्जिअममधील वर्लिनवेस्ट (VerlinWest) मधून निधी येतो. वेर्लिनवेस्टने 10 वर्षांपूर्वी सुला विनयार्ड्समध्ये गुंतवणूक केली होती. राजीव सामंत हे सुला विनयार्ड्सचे एमडी आणि सीईओ (Rajeev Samant, MD & CEO, Sula Vineyards) आहेत. राजीव सामंत यांनी 1999 मध्ये नाशिकमध्ये पहिल्या वाईनरीची (सुला विनयार्ड्स) स्थापना केली. आज सुला ही भारतातील आघाडीची वाईन कंपनी असून ती जगभरातील वाईन ब्रॅण्डचे नेतृत्व करते.

कंपनीने अद्याप IPO ची तारीख किंवा किंमत निश्चित केलेली नाही. पण शेअर्सची किंमत प्रत्येकी 2 रूपये असेल, असे सांगितले जात आहे. कंपनी सर्व इश्यू म्हणूजे 25,546,186 इश्यू ऑफर फॉर सेल म्हणून असणार आहेत. वर्लिनवेस्ट (VerlinWest) आणि वर्लिनवेस्ट फ्रान्स (VerlinWest France) यांच्याद्वारे अनुक्रमे 7,191,835 आणि 4,990,920 आणि कंपनीचे एमडी सामंत हे 1,171,504 इश्यू ऑफर करतील. सेबीकडे डीआरएचपीचे (DRHP) ई-फायलिंग झाले आहे. आयपीओमध्ये फक्त ऑफर फॉर सेल (Offer for Sale) समावेश आहे. ज्याचा भाग वर्लिनवेस्ट असणार आहे. कोटक महिंद्रा कॅपिटल (Kotak Mahindra Capital), सीएलएसए इंडिया (CLSA India) आणि आयआयएफएल सिक्युरिटीज (IIFL Securities) हे सुला आयपीओचे बुक रनिंग लीड मॅनेजर तर केफिनटेक (KFinTech) या इश्यूचे रजिस्ट्रार आहे.