आयुष्यात योग्यवेळी आवश्यक पाऊल उचलल्यास कुठल्याही ध्येयापर्यंत पोहोचता येते. याचा प्रत्यय आपल्याला ओयो हॉटेल्स व होम्सचे संस्थापक व सीईओ रितेश अग्रवाल (Oyo founder and CEO) यांच्या जीवनप्रवासातून पाहायला मिळतो. देशभरात रितेश अग्रवाल हे चेहऱ्याने प्रसिद्ध नसले तरी त्यांचे व्यावसायिक क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय आहे. बहुतेक लोक रितेश यांच्या जीवन चरित्र सामान्य नसून तरुण उद्योग इच्छुकांसाठी प्रेरणादायी आहे. रितेश यांच्या संघर्षमय प्रवासाचे रूपांतर यशात झाले आहे.
ओडीसात रितेश यांचा जन्म (Ritesh Agrawal Was Born in the State Of Odisha)
ओयोचे संस्थापक रितेश अग्रवाल यांचा जन्म ओडीसा राज्यातील बिसम कटक या निसर्गरम्य शहरात झाला. रिटेश यांची व्यावसायिक कौटुंबिक पार्श्वभूमी होती. यामुळे त्यांना लहानवयातच नेतृत्वाचे बाळकडू मिळाले आहे. त्यांनी दक्षिण ओडीसातून व्यवसायाला सुरुवात केली. वयाच्या आठव्या वर्षी. रितेश यांना कोडिंगची आवड होती. त्यांनी बालपणातील बहुतांश वेळ कोडिंग शिकण्यात घालवला मात्र तंत्रज्ञानाबरोबरच एक यशस्वी उद्योजक होण्याचे स्वप्न रितेश यांनी पहिले होते. त्यांनी किशोरवयातच व्यवसाय सुरू केला होता. या यशापर्यंत पोहोचण्याआधी रितेश यांनी सिमकार्ड विकायला सुरुवात केली होती.
पदवी पूर्ण केल्यानंतर गाठले दिल्ली शहर
सेंट जोन्स सीनियर सेकेंडरी स्कूल येथून पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी भारताची राजधानी दिल्ली येथे जाण्याचा निर्णय घेतला. तेथील उंच इमारती, भरपूर संधी आणि वेगाने होणारी प्रगती पाहून रितेश यांना शहरी जीवनाची भुरळ पडली. त्यांनी दिल्ली शहराला आपल्या व्यवसायासाठी निवडले. सर्वप्रथम रितेश यांना भारतीय हॉटेल क्षेत्रातील एक समस्या लक्षात आली.ही समस्या म्हणजे भारतात इतरत्र ठिकाणी सहलीचे आर्थिक नियोजन करून प्रवासी गेले असता त्यांना निवासाची व्यवस्था नीट मिळत नाही. या हॉटेल्समध्ये पुरेशी स्वच्छता नसणे व काही मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी योग्य निवासस्थान मिळणे कठीण होते. हे लक्षात घेऊन त्यांनी 2011 मध्ये 'ओरेव्हल ट्रॅव्हल्स या नावाने व्यवसाय सुरू केला.
बँक अकाऊंटमध्ये शिल्लक होते फक्त 30 रुपये (Named in the list of 30 richest people in the world)
ओरेव्हल ट्रॅव्हल्सचे बाजारात सुमार प्रदर्शन होते.यावेळी रितेश यांना लक्षात आले की भारतात परवडनाऱ्या हॉटेल्सची समस्या नसून गुणवत्तेचा अभाव आहे. रितेश यांना असे आढळले की आर्थिक नियोजन करून प्रवासाला निघालेल्या प्रवाशांना अनेकदा आवश्यक गोष्टींशी तडजोड करावी लागते. जसे की वातानुकूलित रूम्स, वाय-फाय, अन्न व बेड यात सुधारणा केल्यास व सर्व सुविधांची पूर्तता केल्यास त्या ग्राहकांसाठी आकर्षक ठरू शकतात दरम्यान ओरेव्हल ट्रॅव्हल बाजारात टिकून राहण्यासाठी संघर्ष करत होती. कारण हे मॉडेल भारतीय व्यावसायिक बाजारपेठेला शोभत
नव्हते. यामुळे त्यांनी बदल करण्याचे ठरवले मात्र यावेळी त्यांच्या बँक अकाऊंटमध्ये मात्र 30 रुपये शिल्लक होते. त्यांनी विपरीत परिस्थितीवर मात करून जगभरातील 30 सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत प्रवेश मिळवला.