Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Stylish Umbrellas : पावसात भिजू नका! घरबसल्या खरेदी करा 500 रुपयांपर्यंतच्या आकर्षक छत्री

Stylish Umbrellas : पावसात भिजू नका! घरबसल्या खरेदी करा 500 रुपयांपर्यंतच्या आकर्षक छत्री

पावसाळ्यात सुरक्षित राहण्यासह स्टायलिश राहण्याकडेही आपला कल असतो. मात्र, पावसामुळे कपडे भिजून आपले आरोग्य आणि आपली स्टाईल दोन्ही बिघडण्याची शक्यता असते. या गोष्टी टाळण्यासाठी आपण सुरक्षेच्या दृष्टीने छत्री खरेदीला प्राधान्य दिले पाहिजे. आज आपण पुढील काही आकर्षक आणि टिकाऊ छत्रींची माहिती घेऊ ज्या आपणास 500 रुपयांपर्यंत घरबसल्या खरेदी करता येतील.

राज्यात सध्या काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी संततधार पावसाच्या सरी बरसत आहेत. अशा पावसात कामासाठी बाहेर पडत असताना प्रत्येकालाच छत्रीची गरज भासते. त्यामुळे आज आपण काही टिकाऊ आणि बजेटमधील छत्रींची माहिती जाणून घेऊयात. सध्या ई कॉमर्सची सेवा देणाऱ्या अनेक संकेतस्थळावर आकर्षक आणि टिकाऊ छत्र्या उपलब्ध आहेत. ज्या 500 रुपयांच्या बजेटमध्येदेखील आपले पावसापासून संरक्षण करतील.

पावसाळ्यात सुरक्षित राहण्यासह स्टायलिश राहण्याकडेही आपला कल असतो. मात्र, पावसामुळे कपडे भिजून आपले आरोग्य आणि आपली स्टाईल दोन्ही बिघडण्याची शक्यता असते. या गोष्टी टाळण्यासाठी आपण सुरक्षेच्या दृष्टीने छत्री खरेदीला प्राधान्य दिले पाहिजे. आज आपण पुढील काही आकर्षक आणि टिकाऊ छत्रींची माहिती घेऊ ज्या आपणास 500 रुपयांपर्यंत घरबसल्या खरेदी करता येतील.

जॉन्स अंब्रेला John's Umbrella

जॉन्स अंब्रेला ही एक आकर्षक आणि टिकाऊ छत्री आहे. ही छत्री आकाराने मोठी असून ती बंद केल्यानंतर तीन ठिकाणी फोल्ड होते. त्यामुळे तुम्हाला ती सहजपणे हाताळता येते शिवाय बॅगमध्येही सामावते. या छत्रीची मुख्य नळी ही स्टीलची असून काड्याही नळी प्रमाणेच मजबूत देण्यात आल्या आहेत. अॅमेझॉनवर ही छत्री तुम्ही 499 रुपयांना खरेदी करू शकता. यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या आणि आकर्षक रंगसंगतीमध्ये छत्री खरेदी करता येईल.

व्होल्टोनिक्स  Voltonix Umbrella

पावसाळ्यात प्रवास करायचा असेल व्होल्टोनिक्स छत्री एक उत्तम पर्याय आहे. ही छत्री पुरुष, महिला आणि मुलांसाठी डिझाइन करण्यात आली आहे. ही वजनाने हलकी आणि टिकाऊ आहे. शिवाय ही निळ्या आणि काळ्या आकर्षक रंगामध्ये उपलब्ध आहे.छत्रीच्या हँडलला रबराचे ग्रीप बसवण्यात आल्याने जोरदार वाऱ्यातही तुमची पकड मजबूत राहते. छत्रीचा आकारही मोठा असल्याने ती दोन किंवा दोन व्यक्तीचे पावसापासून संरक्षण करण्यासाठी उपयुक्त आहे.अॅमेझॉनवर ही छत्री तुम्ही 499 रुपयांना खरेदी करू शकता.

सन अंब्रेला SUN Umbrella

सन अंब्रेला ही आकारने मोठी आणि शाइन ब्लॅक कलर मध्ये उपलब्ध असलेली सर्वाधिक पसंतीची छत्री आहे. ही छक्षी 2 भागात फोल्ड होत असून ही एक स्टायलिश आणि फंक्शनल छत्री आहे. ही छत्री ऑटोमॅटिक ओपन आणि मॅन्युअल क्लोज अशा दोन्ही सुविधांसह उपलब्ध आहे.ही छत्री भारतातच डिझाइन करण्यात येत असून  पुरुष आणि महिलांसाठी वेगवेगळ्या स्वरुपात उपलब्ध आहे. तुम्ही ही छत्री अॅमेझॉनवर 440 ते 485 रुपयांना खरेदी करू शकता.

रायलन पोर्टेबल ट्रॅव्हल छत्री  Rylan Portable Travel Umbrella

ही छत्री पाऊस आणि वाऱ्यामध्ये वापरण्यासाठी अतिशय योग्य आहे. ही अॅटोमॅटिक उघडझाप करता येत असून वजनाने देखील हलकी आहे. ही छत्री एका व्यक्तीच्या वापरासाठी तयार करण्यात आली आहे. छत्रीला रबराइज्ड नॉन-स्लिप हँडल देण्यात आले आहे.  तसेच ही छत्री विविध रंगामध्ये उपलब्ध आहे. स्त्रिया आणि पुरुषांसाठी वेगवेगळ्या प्रकारात उपलब्ध आहे. कामावर किंवा शाळेत जाण्यापासून ते कार, बॅकपॅक, पर्स किंवा ब्रीफकेसमध्ये ठेवण्यासाठी ही एक आटोपशीर छत्री खरेदीसाठी चांगला पर्याय आहे. तुम्ही ही छत्री अॅमेझॉनवर 469 रुपयांना खरेदी करू शकता.

केसी पॉल अँड सन्स KC Paul& Sons

ब्लॅक सिल्व्हर पॉलिस्टर कपड्याची आणि दोन फोल्डची ही छत्री टिकाऊ आणि हाताळायला सोपी आहे. ही खास करून ज्येष्ठ नागरिकांसाठी डिझाईन करण्यात आली असून तिचा स्टायलिश लूक आकर्षक दिसतो. ही फक्त काळ्या रंगात उपलब्ध असून तुम्ही अॅमेझॉनवर ही 389 रुपयांना खरेदी करू शकता