नवनवीन Start-Up कंपनीमध्ये Investment करणारी, भांडवल उपलब्ध करुन देणारी America मधली आघाडीची सिलीकॉन व्हॅली बँक (SVB) कोलमडल्यानंतर जगभरात पुन्हा एकदा जागतिक मंदीची चर्चा जोर धरु लागली. या मंदीकाळात वित्तसंस्था सक्षम आहेत की नाहीत हे तपासण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सर्व सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांनी Stress Test करावी, असे निर्देश केंद्रीय अर्थमंत्री Nirmala Sitharaman यांनी दिले आहेत. त्यामुळे बँकेचे तणाव परिक्षण म्हणजे नेमके काय आणि कसे करणार असा प्रश्न आपसुकच आपल्या सगळ्यांना पडला असणार. तर पाहुयात बँकेचे तणाव परिक्षण का व कशा पध्दतीने केले जाते.
Union Finance Minister Smt. @nsitharaman chaired a meeting to review the preparedness of Public Sector Banks #PSBs in wake of the stress in banking systems in the US and Europe
— Ministry of Finance (@FinMinIndia) March 25, 2023
Read more ➡️ https://t.co/iBVzbAUNwx
(1/5) pic.twitter.com/MqJxmiFSPw
बँकेची तणाव परिक्षण चाचणी (Stress Test of Bank)
ज्याप्रमाणे आपण सुरक्षा यंत्रणा, अग्निशमक दल सक्षम आहे की नाही हे तपासण्यासाठी मॉक ड्रिल करतो त्याचप्रमाणे आपली बँक ही आर्थिक जोखीम वा संकटाला सामोरे जाण्यासाठी सक्षम आहे की नाही हे तपासण्यासाठी एक चाचणी घेतली जाते. या प्रक्रियेला तणाव परिक्षण चाचणी असे म्हटले जाते. या चाचणीमध्ये मुळत: एखादे आर्थिक संकट उद्भवल्यास आपली बँके तग धरुन राहू शकते की नाही हे तपासले जाते.
या चाचणीमध्ये संगणक प्रोग्रामिंग द्वारे आणि काल्पनिक आर्थिक संकटाची परिस्थिती निर्माण करून बँकेतील क्रियाशिल मालमत्ता (परफॉर्मिंग असेट) आणि निष्क्रिय मालमत्ता (नॉन-परफॉर्मिंग असेट) यांची वर्षातून एकदा चाचणी केली जाते. यामध्ये उधारिची जोखिम (क्रेडिट रिस्क),बाजार जोखिम (मार्केट रिस्क) व लिक्विडिटी रिस्क अशी एकुणच बँकेची आर्थिक स्थिती तपासली जाते. या चाचणीसाठी फेडरल रिझर्व्ह व आंतरराष्ट्रीय नाणे निधीकडून ही प्रमाणे वा मापकं देण्यात आली आहेत.
चाचणीला कधीपासून झाली सुरूवात?
2008 सालच्या जागतिक मंदीनंतर बँकिग क्षेत्रामध्ये अशा प्रकारच्या तणाव मापण चाचणी करण्यास सुरूवात झाली. या चाचणीमुळे आर्थिक संकटाच्या काळात मोठ-मोठ्या बँकाही बुडीत निघतात तेव्हा हा आर्थिक संसर्ग खूप मोठ्या प्रमाणावर पसरून खूप मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. हे सगळं टाळण्यासाठी व सावध होण्यासाठी अशा प्रकारणी तणाव चाचणी करण्यास सुरूवात झाली.
बँकेच्या तणाव चाचणीचा उपयोग
तणाव मापण चाचणीमुळे बँकाना आपली आर्थिक ताकद आजमावता येते.वित्तसंस्थामधील व्यवहारांमध्ये पारदर्शकता येते.या चाचणीचा अहवाल प्रकाशित केल्यावर ग्राहकांना आपल्या बँकेची आर्थिक पत जाणून घेता येते. या चाचणीनुसार गुंतवणूकदारांनाही गुंतवणूकी संदर्भातले निर्णय घेण्यास सोप्पे होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आर्थिक संकटात आपली बँक आणि आपला पैसा सुरक्षित आहे हा विश्वास ही ग्राहकांमध्ये निर्माण होण्यास मदत होते.
Source - https://bit.ly/3FSvoeH